वाशी येथील सिडको सेंटर मध्ये राज ठाकरे यांचा नवी मुंबई संघटनात्मक दौरा संपन्न झाला.
दशरथ कांबळे - प्रतिनिधी मुबंई
मुंबई : मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी विविध कामाबद्दल संवाद साधला असून, या दौऱ्यादरम्यान राजसाहेब ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटना कशी वाढवावी, लोकांशी कसा संपर्क साधावा याचा कानमंत्र दिला.
त्याच प्रमाणे नवी मुंबईत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांशी संवाद साधून प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव,विचारवंत सतीश तांबे आणि इतर अनेक मान्यवरांशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे,अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहरअध्यक्ष नीलेश बाणखिले,सविनय म्हात्रे, विनोद पार्टे,शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, रुपेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.