राजू निर्वाण यांचे जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस पदी पदोन्नती.
★ तालुक्यातील काँग्रेसकार्यकर्त्यांनी केले स्वागत.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : लाखनी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजू रामभाऊ निर्वाण यांची जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस पदी पदोन्नती करण्यात आली. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही नियुक्ती अर्थात पदोन्नती पार पडली. तालुक्यातील तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांची जोडलेली नाळ राजू निर्वाण यांना चांगल्या तऱ्हेने अभ्यासित असल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांना पदोन्नती दिली. ते ४ वर्षापासून लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी विराजमान होते. तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पेढा भरवीत पुष्पगुच्छ देत त्यांच्या निवडीचे अर्थात पदोन्नतीचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या स्वाक्षरीने त्यांना पदोन्नतीचे पत्र देण्यात आले.