आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रयत्नाने जगनाडे चौक वरठी येथे सर्व बसेसला थांबा मंजूर.
एस.के.24 तास
भंडारा : जगनाडे चौक वरठी येथे तुमसर,भंडारा मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या सर्व बसेसला साधारण, जलद,निमआराम,शिवशाही आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रयत्नाने थांबा मंजूर करण्यात आहे.
त्यावेळी मा.श्री.आदरणीय माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते बसेसला हिरवी झेंडी दाखवून बसेस मध्ये प्रवासीच्या चढ/ उतार करून बसेस ला रवाना करण्यात आला, त्यावेळी मा. श्री. आदरणीय, माणिकरावजी कारेमोरे यांना पुष्पगुच्छ शाल,श्रीफळ,देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमात प्रसंगी प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, महिला भगिनी, ग्रामवासी,बालगोपाल,ज्येष्ठ नागरिक, प्रामुख्याने उपस्थित होते.