- ✍️खेमदेव कन्नमवार यांच्या लेखणीतून.... नशिबाच्या रेषा ओलांडून पुढे जाणारी संघर्ष कन्या.

✍️खेमदेव कन्नमवार  यांच्या लेखणीतून....

कु.दिव्यानी विकास बिलकुरवार या मुलीची महाराष्ट्र पोलीस म्हणून नागपूर शहर पोलिस दलात निवड.


नशिबाच्या रेषा ओलांडून पुढे जाणारी संघर्ष कन्या.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व खेड्यात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या कु.दिव्यानी विकास बिलकुरवार या मुलीची महाराष्ट्र पोलीस म्हणून नागपूर शहर पोलिस दलात निवड झाली आहे.

कु.दिव्यानी विकास बिलकुरवार यांचे अभिनंदन करताना. - श्री.खेमदेव कन्नमवार व सौ.सुनंदा खेमदेव कन्नमवार   


       अनेक अडथळे पार करीत जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या दिव्यानीचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा परिसस्पर्श आहे.

       महाराष्ट्र पोलीस म्हणून नियुक्त होणे कदाचित इतरांना सामान्य बाब वाटत असेल परंतू  ज्या परिस्थिती मधून दिव्यानीने स्वताला प्रयत्नपूर्वक बाहेर काढत हे यश मिळविले त्यासाठी ती नक्कीच कौतुकास पात्र आहे.

        दिव्यानीचे आई वडील अल्पशिक्षित असून घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे गरिबिवर मात करण्यासाठी काबाडकष्ट करून ते घर चालवीत असत. जेमतेम मिळणाऱ्या मोबदल्यात दोन मुली व एक मुलाचे शिक्षण पूर्ण करणे त्यांना सहज शक्य नव्हते. पण आपल्या आयुष्यातील संघर्ष मुलींच्या वाट्याला येऊ द्यायचा नसेल तर शिक्षण हा एकच पर्याय आहे. याची जाणीव त्यांना झाली म्हणून त्यांनी दोन्ही मुलींना व मुलाला चांगले शिकविले 

        सुजाण संगोपन कसे असावे याचे शास्त्रशुद्ध माहिती असणाऱ्या आई वडिलापैकी ते नव्हते पण अगदीच संकुचित विचार करणारेही ते नव्हते. म्हणून मुलगा - मुलगी असा भेद न करता दोन्ही मुलींना व मुलाला शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून दिली.

        पोटापाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिव्यानीचे वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतात व आई दुसऱ्यांच्या घरातील घरकाम करते.

      

       दिव्यानी व तिची लहान बहीण शाळेच्या बॅगा ठेवून महाविद्यालयाच्या बॅगा उचलल्या आणि त्यात भविष्यातील योजना व स्वप्नं नीट ठेवून वाटचाल करू लागल्या तेव्हा त्यांना भविष्यात काही चांगले घडेल असे वाटत नव्हते. तरी चचापडत का असेना त्यांनी केलेली वाटचाल आज उजेडाच्या झोतात सर्वांना स्पष्ट दिसत आहे.

        खर पाहता भविष्य कोणालाही स्पष्ट दिसत नाही. पण काही लोकांच्या आजूबाजूला भविष्य निर्माण करणारे मजबूत हात असतात त्यामुळे त्यांचे भविष्य निर्माण केले जाते.... खरच नशीबवान आहेत ते ज्यांना असे हात मिळतात. पण प्रत्येकाच्या वाट्याला असे हात लाभतील हे सांगता येत नाही.

        

      दिव्यानीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले व ती स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली. दोन तीन वर्ष झाले तरी नोकरी मिळत नव्हती. दोनदा तर अगदी कमी गुणांनी ती प्रतीक्षा यादीत राहिली. म्हणून तिचे आई वडील तिला लग्न करण्यास प्रवृत्त करू लागले. आई वडिलांच्या मताला दुजोरा देवून   समाजाने निर्माण केलेली व्यवस्था एक मुलगी म्हणून तिला पाळणे आवश्यक होते. 


पण तिने स्वतः स्वताला केलेली कमेंटमेंट पूर्ण करण्यासाठी आई वडिलांकडून पुन्हा दोन वर्ष मागून घेत लहान बहिणीचे लग्न आधी करण्याची विनंती केली. या निर्णयाबद्दल खरंच तिच्या हिमातीला दाद द्यायलाच पाहिजे. 

कारण दोन तीन वर्ष प्रयत्न करून सुद्धा नोकरी लागत नव्हती तसेच लग्नाचे वय सुध्दा झाले होते.असे असताना नोकरी मिळाल्या शिवाय लग्न करणार नाही असा धाडशी निर्णय घेणे मुलींना तरी सहज शक्य नाही. असे धाडस करताना स्वतःवर व स्वताच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. दिव्यानीला स्वतःवर पूर्ण विश्वास होता म्हणून ती आपल्या निर्णयावर ठाम राहू शकली.

      

समाज प्रगत झालेला आहे तरी समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे असे वाटत नाही. कारण आजही बहुतांशी  मुलींना स्वताच्या भविष्याचे निर्णय स्वतः घेण्याची मोकळीक दिली जात नाही हे कटू सत्य आहे.

      दिव्यानीने लोकांच्या बोलण्याला थारा न देता व लक्ष विचलित न होऊ देता शारीरिक व्यायाम तसेच अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. या काळात ती 

सार काही अव्यक्त राहून उघळ्या डोळ्यांनी पाहत होती,मनोबल तोडणारे शब्द ऐकत होती. पण तिचा निग्रह ,सकारात्मक ऊर्जा,आंतरिक शक्ती,शारीरिक तसेच मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सक्षम राहण्याची तिची हातोटी विलक्षण होती. म्हणून ती आज स्वतःची कमिटमेंट पूर्ण करून." महाराष्ट्र पोलीस " म्हणून रुजू होत आहे.

खरंच अभिनंदनास पात्र आहे ती.नाउमेद झालेल्या तरुण डोळ्यातील उमेद आहे ती.स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मुलीसाठी आयकॉन आहे....तिने इतिहास रचला असे म्हणता येणार नाही.पण तिच्या संघर्षाची कहाणी काही दिवसच नाही तर काही वर्ष तरी नक्कीच प्रेरणेचे प्रतीक म्हणून सांगितले जाईल हे मात्र खरे आहे.


      तेरे जिद का असर यह हुवा,

      मांगने लगे सब तेरे लिए दुआ!

      

कधी परिस्थितीने, कधी नशिबाने तर कधी व्यवस्थेने निर्माण केलेले अडथळे जिद्दीने पार करीत यशाची पायरी चढणाऱ्या " दिव्यानीचे " पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन..! 

पोलिस म्हणून कर्तव्य बजावत असताना देश सेवा करण्याची संधी  दिव्यानीला मिळाली आहे. याची जाणीव ठेवून ती आपल्या प्रतिभेने महाराष्ट्र पोलीस दलाला  नवी उंची प्राप्त करून देईल असा विश्वास आहे.


दिव्यानीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!🌹🌺🌷🌸💐


✍️खेमदेव कन्नमवार सौ.सुनंदा खेमदेव कन्नमवार                          ऊर्जानगर,चंद्रपूर

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !