रनमोचन येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व बौद्ध विहाराचे अनावरण सोहळा संपन्न.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पंचशील बौद्ध विहार रणमोचन च्या सौजन्याने पुजनीय सुमिधा भिक्शुनी यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बुद्ध विहाराचा अनावरण सोहळा ठीक ११:०० वाजता बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटन शिवानीताई विजय वडेट्टीवार युवक काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांच्या शुभहस्ते पार पडले.सहउद्घाटक म्हणून प्रा. डॉ.राजेश कांबळे माजी समाज कल्याण सभापती चंद्रपर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुविधा भिक्शुनी यांनी भूषविले. यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून प्रमोद चिमूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य, नेपाल टेंभुर्णे आर्किटेक इंजिनियर पुणे, सोनूभाऊ नाकतोडे तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस, तथा अध्यक्ष तालुका सरपंच संघटना,
सुरज मेश्राम अध्यक्ष ब्रह्मपुरी शहर युवक काँग्रेस, स्मिताताई पारधी माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, योगिता आमले शहर अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, उमेश धोटे सरपंच ग्रामपंचायत चौगान तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी, पत्रकार गोवर्धन दोनाडकर ब्रम्हपुरी, सरपंच नीलिमा राऊत ग्रामपंचायत रनमोचन, संजय प्रधान अध्यक्ष काँग्रेस ग्राम कमिटी रणमोचन,तथा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच सदाशिव ठाकरे, टेंभुर्णे मॅडम, यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी दलित मित्र प्राचार्य डी .के. मेश्राम तसेच दीपक सेमस्कर शिक्षक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तर रात्री ८ वाजता बुद्ध व भीम गीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम कमलेश भोयर लार्ड बुद्धा टीव्ही फेमसंच यांच्या आवाजात पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केशरी राय साहेब, राहुल शिवनकर समृद्धी कृषी केंद्र बिल्डिंग मटेरियल सप्लायर ब्रह्मपुरी, रमेश प्रधान सायंटिस्ट ऑफिसर मुंबई उपस्थित होते यावेळी रमेश प्रधान सायंटिस्ट ऑफिसर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता रनमोचन पंचशील बौद्ध विहाराचे अध्यक्ष घनश्याम मेश्राम, सचिव गौतम शेंडे, उपाध्यक्ष सचिन शंभरकर, व सर्व बौद्ध समाज बांधवांचे (नवीन आबादी) मोलाचे सहकार्य लाभले.