देशातील नामांकित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्समध्ये शीतलची निवड.

देशातील नामांकित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्समध्ये शीतलची निवड.


एस.के.24 तास


वरोरा : वरोरा तालुक्यातील सालोरी येथील शितल मगरे या विद्यार्थिनीची देशातील लोकसंख्या शास्त्रामध्ये एकमेव कार्यरत असलेली मुंबई येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस (आयआयपीएस) या संस्थेमध्ये निवड झालेली आहे. तिथे ती पॉप्युलेशन स्टडीज या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. 12 मे रोजी घोषित झालेल्या निकालामध्ये शीतलची देश विदेशातील 55 विद्यार्थ्यांमध्ये निवड झालेली आहे.


आयआयपीएस ही संस्था 1956 पासून आशिया पॅसिफिक क्षेत्रात लोकसंख्या अभ्यास, प्रशिक्षण आणि संशोधन यासाठी प्रादेशिक संस्था म्हणून काम करत आहे. या संस्थेचे टाटा ट्रस्ट, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र यांच्या संयुक्त प्रायोजकत्वाखाली व्यवस्थापन सुरू आहे. या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी विविध देशाच्या सरकारमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये तसेच नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रातील प्रमुख पदांवर कार्य करतात. 


एका ग्रामीण क्षेत्रामधील विद्यार्थिनीची या संस्थेत शिक्षणासाठी निवड होणे म्हणजे अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेत शितल दोन वर्षाचा पदव्युत्तर  अभ्यासक्रम पूर्ण करेल. या अभ्यासक्रमादरम्यान तिला भारत सरकारच्या वतीने मासिक 5000 रुपये स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे शितलच्या शिक्षणासाठी आर्थिक समस्या निर्माण होणार नाही.


शितलचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून आनंदवन येथून पूर्ण झाले. त्यानंतर तिने नागपूर मधील अशोकवन येथे एकलव्य इंडिया फाउंडेशन द्वारा आयोजित उच्च शिक्षणाच्या संधी याविषयासंदर्भात तीन दिवसीय शिबिरामध्ये तिने प्रशिक्षण घेतले. शितलचा मोठा भाऊ स्वतः हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तसेच कुटुंबीय उच्चशिक्षित असल्याने शितलला करिअरचा वेगळा मार्ग निवडण्यास समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे तिने या यशाचे श्रेय मोठा भाऊ नागेश मगरे, आई वडील, शिक्षक वृंद आणि एकलव्य इंडिया फाउंडेशनला दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !