साहस शिबिरामध्ये आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन.
एस.के.24 तास
चिमुर : ब्राईट एज फाउंडेशन( मॅजिक परिवार) द्वारा आयोजित सात दिवसीय निवासी साहस वीरांमध्ये आज दिनांक 8 मे 2022 रोजी चिमूर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने 85 मुलींना स्त्री आरोग्य विषयक मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात आली.
साहस शिबिरामध्ये 16 ते 25 वयोगटातील विद्यार्थी आणि तरुणांना कराटे स्वरक्षण, स्त्री विषयक कायदे, स्त्री आरोग्य, उद्योग याविषयी प्रशिक्षण देण्यात येते आज चिमूर तालुका आरोग्य विभागाचे सुरदे सर यांच्या मार्गदर्शनात डॉ अनुश्री नांदगावकर ,कल्पना सिस्टर, घोटेकर सिस्टर यांनी स्त्री आरोग्याच्या समस्यांवर मुलींना मार्गदर्शन केले तसेच मुलींची तपासणी सुद्धा केली.
यामध्ये मासिक पाळी मध्ये घ्यावयाची काळजी त्यामध्ये स्त्रिया बाळगत असलेल्या अंधश्रद्धा कॅन्सर सारखे व इतर आजार स्त्रीच्या सुदृढ आरोग्यासाठी घ्यावयाचा पोषण युक्त आहार स्वच्छतेचे महत्व व त्याचे प्रात्यक्षिक याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.