विधवा मालताबाईच्या मुलीच्या लग्न समारंभाकरिता भाजप नेते माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्र यांचा मदतीचा हात.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक, ०६/०५/२३ ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा या गावच्या रहिवाशी श्रीमती मालताबाई मोरेश्वर ठलाल... अतिशय गरीब कुटुंब...पती जवळपास दहा वर्षांपूर्वी वारलेले... मोठी मुलगी कु. स्नेहा उर्फ मोनिका लग्नाची... दुसरा मुलगा लहान... घरात कमावता व्यक्ती कोणी नाही... कु. स्नेहाचे लग्न जोडल्यानंतर मालताबाई आर्थिक विवंचनेत... विवाह सोहळा १० मे ला.. तिने आपली व्यथा भाजपा सोशल मीडिया संयोजक धीरज पाल यांना सांगितली.
धीरजने देखील क्षणाचाही विचार न करता ही बातमी ब्रह्मपुरी विधानसभेची माजी आमदार आद. प्रा.अतुल भाऊ देशकर यांना सांगितले. भाऊंनी देखील तात्काळ शब्द देऊन "अतुलभाऊ देशकर विचारमंच ब्रह्मपुरी शाखा वांद्रयाच्या" माध्यमातून मदतीचा हात समोर केला.आणि तीन पीपे तेलाचे देऊन मदत केली. अतुल भाऊंच्या मदतीने मालताबाई आणि गावातील जनता भारावून गेलेली आहे.
मालताबाईला मदत प्रदान करताना शंकरदादा सातपुते माजी जि.प.सदस्य चंद्रपूर,धीरज पाल संयोजक भाजपा सोशल मीडिया ब्रह्मपुरी, रामदास कोरडे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी वांद्रा, डेनी आंबोरकर अध्यक्ष भाजयुमो शाखा वांद्रा, चंद्रशेखर मेश्राम सचिव भाजयुमो तथा अध्यक्ष वन समिती वांद्रा, विलास राऊत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी वांद्रा, तसेच टिकाराम ठलाल, रामकृष्ण मेश्राम इत्यादी या क्षणी उपस्थित होते.
भाऊंच्या या परोपकारी कार्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलाल महादेव दोनाडकर,डॉ.गोकुल बालपांडे माणिक पाटील थेरकर, वंदनाताई शेंडे, तनय देशकर,प्रा.यशवंत आंबोरकर, अविनाश मस्के,प्रमोद पाटील सातपुते, लोमेश मेश्राम, एकनाथ मेश्राम,अजय लाडे,राजेश्वर मगरे, ज्ञानेश्वर भोयर,ज्ञानेश्वर दिवटे, अनील तिजारे,पिंटू आंबोरकर,विलास वाकुडकर, चुमदेव जांभुळकर,परवेश ठाकरे,दौलत गरमळे, नीलकंठ मानापुरे,अरूण झंझाड, उमेश घुले, इत्यादींनी अभिनंदन केले.