कैलास गेडाम एक बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी.
एस.के.24 तास
भंडारा (नरेंद्र मेश्राम) : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उकल करून समाजकारणातून राजकारण करणारे स्पष्ट वक्ते म्हणून सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते कैलास भागवत गेडाम आंबेडकरी चळवळीस वाहिलेले व्यक्तिमत्त्व राज्यातील सर्वच दलीत नेत्यांचा सहवास लाभलेले पण कार्यप्रणालीने त्रस्त सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे माध्यमातून अनेक दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला.
पण पात्र असूनही लाभ देण्यास टाळाटाळ होत असेल तर संबंधितास खडसावून सांगन्यास मागे-पुढे न पाहणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून कैलास ची जिल्ह्यात ओळख आहे. विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणाची आवड असल्यामुळे ३० वर्षापूर्वी पशूपदविका संपादन केल्यावरही नोकरी चे मागे न लागता सामाजिक कार्यात सहभागी झाले.
आंबेडकरी चळवळीचा खंदा कार्यकर्ता असल्याने प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, रा.सू. गवई, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे या सारख्या दलीत पुढाऱ्यांशी काम करण्याची संधी मिळाली. रिपब्लिकन पक्षाची काँग्रेस आणि भाजपाशी युती असल्यामुळे या राष्ट्रीय पक्षांचे नेत्यांशीही जवळचा संबंध आला. पण सत्तेत सहभागी असूनही सामाजिक कामे होत नसल्यामुळे अपेक्षाभंग झाल्याने त्यांनी राजकारण सोडले. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम ह्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा उघडला आहे.
कैलास ला डॉ.दाजीबा मेश्राम यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते त्यांना गुरुस्थानी मानत असत. लोकसेवक असूनही ते सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे तोच कित्ता कैलास गीरवीत आहे. सामाजिक कार्यासह त्यांनी शासकीय विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचे कामही केले.
पंचायत समिती च्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे न करता निधी परस्पर विल्हेवाट लावणे, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत युवा व इको क्लब अनुदान कोविड-१९ मुळे शाळा बंद असतांनाही बोगस बिलाद्वारे उचल करणे, कृषी विभागाचे वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील घोळ चव्हाट्यावर आणला, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर व जिल्ह्यात घडलेल्या खैरलांजी जघन्य हत्याकांडातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
या शिवाय आयबीपी चे धर्तीवर जिल्ह्यातच संघ व राज्य लोकसेवा आयोग पात्रता परीक्षा प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावे, साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालयाचे जागेच्या अडचणींचा पाठपुरावा करणे. या सारखे लोकोपयोगी कर्यातही ते सक्रिय होते. गरीब कुटुंबातील या तडफदार मागास कार्यकर्त्याला ७ मे रोजी ५० वर्षे पूर्ण होऊन ५१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचे बहुआयामी कार्यास शुभेच्छा तथा त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.