गारपीट व वादळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकशान ग्रस्तांना भरपाई घ्यावी - सामाजिक कार्यकर्ता विजय भोष्कर यांची मागणी.

गारपीट व वादळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे  पंचनामे करुन नुकशान ग्रस्तांना भरपाई घ्यावी - सामाजिक कार्यकर्ता विजय भोष्कर यांची मागणी.


नरेंद्र मेश्राम

भंडारा : मागिल पंधरा दिवसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्या सह गारांच्या पाऊसाने  अक्षरशः शेतातील फळबागा सह पालेभाज्या, व अन्य पिकांचे,धान पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अजूनही शेतातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे संबंधित विभागाकडून करण्यात न आल्याने शेतकऱ्यांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद नदी किनाऱ्यावर वसलेले आहे.  मोठ्या प्रमाणात कारली, चवळी, टरबूज, काकडी, सह पालेभाजी व अन्य पीक घेतले जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. यासह आणखी दुसरा अन्य पिकासह भाजीपालाचा समावेश आहे.


मात्र मागिल पंधरा दिवसापूर्वी पासुन अचानक पणे आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पाऊसाने होत्याचे नव्हते केले. यात अनेकांच्या फळबाग उध्वस्त केले असून गारांचा पाऊस पडल्याने कारली,चवळी,काकडी ,टरबूज,पालेभाजी, कौलारुची घरांची पळझळ होवुन नुकशान झाले व अन्य पिकांचे जवळपास लाखांचे नुकसान झाले आहे.मात्र अजूनही नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे करण्यात आले नाही.  नुकशान ग्रस्त परिसरात आमदार व तहसिलदार  तसेच अन्य पदाधिकारी नी पाहनी केली .असे नुकसान ग्रस्त शेतकरी  यानी सांगितले. पाऊसानंतर लगेच दोन दिवसांनी कृषी अधिकारी यानी शेतीच्याबांद्दावर जावुन  पंचनामे करावे. 


काही शेतकरी म्हणतो की पंचनामे झालेच नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. यात खरे बोलतात तरी कोण? अधिकारी की शेतकरी!  तसेच अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा केली आहे. यात पंधरा दिवसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्या सह गारांच्या पाऊसाने नुकशानी बरोबर पूर्णतः कारलीचे शेड कोसळले आहे. मात्र अजूनही पंचनामे न झाल्याने शासनाप्रति शेतकरी रोष व्यक्त करीत असून प्रत्येक्षात पंचनामे न करता टेबल सर्वे करून पंचनामे झाले असे खोटे सांगणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून  केली आहे.


मागिल पंधरा दिवसपूर्वी अचानक वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडल्याने शेतातील  धान पीक निघत असतांना हे संकट आल्याने   हाती येणारा पैसा हा अचानक बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. लोकप्रतिनिधीनी लवकरात लवकर दखल घेवुन नुकशानग्रस्तांना भरपाई घ्यावी अशी मागनी सामाजिक कार्यकर्ता विजय भोष्कर यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !