चकपिरंजी येथील ग्रामपंचायत अर्तंगत तोडलेले लाकूड एक वर्षापासून रस्त्यावर ★ आठवड्याभरात उचला,अन्यथा ग्रा.पं. वर धडक मोर्चा.-प्रफुल निरुडवार यांचा इशारा.

 


चकपिरंजी येथील ग्रामपंचायत अर्तंगत तोडलेले लाकूड एक वर्षापासून रस्त्यावर 


★ आठवड्याभरात उचला,अन्यथा ग्रा.पं. वर धडक मोर्चा.-प्रफुल निरुडवार यांचा इशारा.


एस.के.24 तास


सावली : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चकपिरंजी वार्ड नंबर-2 येथे  केशरवाहि, बोथली मुख्य रस्त्यावर मागील एक वर्षापासून लाकूड बेवारस पडून आहेत हि बाब सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी  ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल असता त्या गोष्टी कडे दुर्लक्ष देत आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठलीही दुर घटना घडू नये अशी अपेक्षा गावातील नागरिकांन कडून होत आहे. सोबतच सरपंच यांनी समाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांचा मोबाईल नंबर  ब्लॅकलिस्ट टाकलेला आहे गावातील मुख्य व्यक्ती जर अशा प्रकारे वर्तणूक करत असेल तर मंग गावातील समस्या मांडायच कोणाजवळ असा प्रश्न पढतो.


येत्या एका आठवड्यात लाकूड उचलावे अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल सामाजिक कार्यकर्ते,प्रफुल निरुडवार यांनी म्हटले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !