साहस विद्यार्थिनींना मोह फुलांपासून विविध खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण.

साहस विद्यार्थिनींना मोह फुलांपासून विविध खाद्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण.

एस.के.24 तास


चिमुर : आपल्या देशातील महिला 21 व्या शतकात सुद्धा आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित आहे. म्हणून परिसरातील तरुणांनी विविध लघुउद्योग शिकून आर्थिक स्वावलंबी बनाव्यात याकरिता ब्राईटएज फाउंडेशनच्या वतीने साहस शिबिराचे आयोजन केले आहे.यामध्ये आज दिनांक 4 मे 2023 रोजी मुलींना मोहफुलापासून व कवठापासून विविध खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या वतीने प्रशिक्षक म्हणून सुष्मिता हेपट व शालिनी देशमुख आणि उमेद अभियानाच्या रसिका ननावरे यांनी प्रशिक्षकाची भूमिका निभावली.


ब्राईट एज फाउंडेशनच्या वतीने भिसी येथील डॉ रमेश कुमार गजबे शिक्षा संकुल येथे सातदिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तब्बल 100 विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेला असून यामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध विषयाची सत्रे आयोजित केलेली आहे. मुलींना विशेषतः कराटे प्रशिक्षणाचे व संरक्षणाचे धडे देण्यात येत आहे. यासाठी ब्रह्मपुरी येथील कृष्णा समरीत,श्रावणी पोपट आणि तनुजा इचकापे प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावत आहे. कराटे सोबतच विद्यार्थिनींची होणारी फसवणूक व त्यावर उपाय यासाठी भिशी पोलीस स्टेशनच्या पुष्पा बोधाने मार्गदर्शन करणार आहे. 


तसेच मुलींना स्त्री विषयक कायद्यांची माहिती व्हावी व त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करावा. याकरिता अनेक वकील मंडळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये ऍड. प्रशिक वानखेडे हे ॲट्रॉसिटी ॲक्ट विषयी माहिती देणार आहे. तसेच ऍड. राहुल वासनिक हिंदू वारसा हक्क कायदा याचे प्रशिक्षण देणार आहे. सोबतच ऍड. पिंकी कोसारे पोस्को आणि भारतीय संविधान तर ऍड सुजाता धनविजय मुलींचा शिक्षणाधिकार आणि सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन करणार आहे. ऍड भूपेंद्र सोने भारतीय दंडविधानातील महिलांच्या दृष्टिकोनातील कलमांविषयी माहिती देणार आहे.


सोबतच मुलींना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी उद्योग निरीक्षक शालू घरत उपस्थित राहणार आहे. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लघु उद्योगाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध पदार्थांची निर्मिती आणि त्याची विक्री याविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सात दिवशीय निवासी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वाल्मीक नन्नावरे, नामदेव घोडमारे, रोशन हजारे, प्रफुल्ल बरडे, अमित घोडमारे, सचिन सोनवणे, अमोल ननावरे, सुनील नन्नावरे, युवराज जांभुळे, आश्विन मगरे व ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे परिश्रम घेत आहेत.


"विकासाचा मार्ग हा स्वातंत्र्यातून निर्माण होत असतो. स्त्रीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही साहस शिबिराचे दरवर्षी आयोजन करत असतो. यामध्ये मुलींनी स्वतःचे रक्षण स्वतः कराव यासाठी कराटे प्रशिक्षण, संरक्षणाचे धडे, शारीरिक कसरत घेत असतो. यासोबतच स्त्री सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. याकरिता विविध लघु उद्योगाचे प्रशिक्षण सुद्धा आम्ही आयोजित केले आहे.


मोहफूलाचा फक्त मद्य बनवण्यासाठी वापर केला जातो.पण आम्ही त्यापासून विविध पदार्थची निर्मिती करून भविष्यातील स्त्रीला ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचा प्रयत्न आहे " - विलास चौधरी, संयोजक,साहस

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !