मॅजिकमार्फत देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपला असंख्य मुलींपर्यंत पोहोचवण्याची गरज ; सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्याने यश मिळते - शालू घरत



मॅजिकमार्फत देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपला असंख्य मुलींपर्यंत पोहोचवण्याची गरज ; सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्याने यश मिळते - शालू घरत


★ शालूचा ब्राईटएज फाउंडेशनतर्फे सत्कार.


एस.के.24 तास


चिमुर : ब्राईटएज फाउंडेशन अंतर्गत मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा स्कॉलरशिपमुळे माझी आर्थिक अडचण दूर होण्यास मदत झाली. ही स्कॉलरशिप असंख्य मुलींपर्यंत पोहोचवण्याची गरज असून मी स्वतः या स्कॉलरशिपमध्ये योगदान देऊन मुलींना मदत करेल, असा संकल्प नुकतीच उद्योग निरीक्षक म्हणून निवड झालेली शालू घरतने बोलून दाखवला. दिनांक 5 मे 2023 रोजी साहस शिबिरामध्ये आयोजित सत्कार सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमात ती बोलत होती. 

एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट क परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावत उद्योग निरीक्षक पदावर निवड झालेली शालू घरतने आज मॅजिकला भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शालूचे बाबा शामराव घरत आणि मामा राजू जांभुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रसंगी बोलताना शालू ने स्वतःचा प्रवास साहस शिबिरार्थी समोर उलगडून दाखवला. यावेळी तिने स्वतःच्या शैक्षणिक प्रवासात आलेले अडथळे आणि संकटी यावर भाष्य करत त्यातून निघालेल्या मार्गावर सविस्तर विवेचन केले तसेच आपण सकारात्मक लोकांच्या प्रवासात राहिलो तर अनेक नकारात्मक भावना नष्ट होतात आणि आपल्याला यश मिळायला सोपे जाते असे यावेळी तिने नमूद केले.


 सोबतच तिने मॅजिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन साहस विद्यार्थिनी वनश्री रंधये प्रास्ताविक  प्रियांका बारेकर आणि आभार प्रदर्शन सायली जांभुळे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !