शा.औ.प्र.संस्थेत १५ मे रोजी छ. शाहु महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे भव्य आयोजन.

शा.औ.प्र.संस्थेत १५ मे रोजी छ. शाहु महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे भव्य आयोजन.


एस.के.24 तास


गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे आयोजन येत्या १५  मे रोजी सकाळी ९  वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.  सदर मेळाव्याचे उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खा. अशोक नेते यांच्या हस्ते होत  असून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी गडचिरोली,आ. कृष्णाजी गजबे आरमोरी,आ.धर्मरावबाबा आत्राम  अहेरी  उपस्थित राहणार आहेत.  तसेच विशेष अतिथी म्हणून  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद  गडचिरोली आणि  अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील  गडचिरोली हे उपस्थित राहणार आहेत.


या शिबिरांमध्ये दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी तसेच व्यक्तिमत्व विकास,मुलाखतीचे तंत्र या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे . रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध बँका आणि वित्तीय संस्था यांचे सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे सुद्धा रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी शासनाच्या विविध योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.


 तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलांमध्ये नोकरीच्या विविध संधी आणि अग्नीवीर योजनेविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.


 शिबिरस्थळी  प्रदर्शिनी लावण्यात येत असून त्यात विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहेत. तरी  जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगीरवार आणि कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य संतोष साळुंखे  यांनी केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !