काँग्रेस कमेटीच्या लाखनी तालुका अध्यक्षपदी योगेश झलके
नरेंद्र मेश्राम
भंडारा : लाखनी तालुक्यातील खराशी येथील सरपंच योगेश डोमाजी झलके यांची लाखनी तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती /निवड करण्यात आली. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही निवड पार पडली. पक्षाशी एकनिष्ठ राहून खेड्यापाड्यातील तरुण उत्साही कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची ओळख व प्रशासनात गरजूंना सहकार्य करण्याची दातृत्व भावना ओळखून जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या स्वाक्षरीने त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
पालांदूर व खराशी गावात नियुक्तीची वार्ता पोहोचताच कार्यकर्त्यात उत्साह संचारला. कार्यकर्त्यांनी झलके यांचे घर गाठत अभिनंदन केले. सोशल मीडियावरही अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. राष्ट्रीय मजदूरसंघ(इंटक) तालुकाध्यक्ष लाखनी या पदार सुद्धा त्यांनी काम केले. गावात उपसरपंच म्हणून सुद्धा पाच वर्षे यशस्वी जबाबदारी सांभाळली.