आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना निवेदन.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
अर्जुनी मोर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी/मोर च्या वतीने अर्जुनी/मोर. विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वाखाली अर्जुनी/मोर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या मका व धान या पिकाच्या नुकसानीची पंचनामा करून शासनाने तातडीने पंचवीस हजार रुपये मदत करावी,मका व धान खरेदी करण्यासाठी सातबारा ऑनलाईन नोंदणी त्वरित सुरू करावी.
धान व मका या पिकांचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकर्यांना नवीन विद्युत कनेक्शन देऊन 24 तास विद्युत देण्यात यावी या मागण्या पूर्ण करण्यासाठी तहसिल कार्यालय अर्जुनी/मोर येथे तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. या मागण्या पूर्ण न झाल्यास हजारो शेतकर्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सरकार व प्रशासनाला दिला.
निवेदन देतांना यावेळी श्री लोकपाल गहाणे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अर्जुनी/मोर, श्री इंजि.यशवंत गणवीर उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद गोंदिया, श्री यशवंत परशुरामकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी/मोर, श्री भोजराम रहिले संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्री मनोहर सहारे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, श्री किशोर ब्राह्मणकर युवक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, श्री आर के जांभुळकर तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय, श्री योगेश नाकाडे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,श्री रतीराम राणे अध्यक्ष किसान सेल राष्ट्रवादी काँग्रेस ,सौ शिशुला हलमारे महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,सौ माधुरी पिंपळकर महिला शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,श्री हेमकृष्णदादा संग्रामे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, सौ मंजुषा बारसागडे नगराध्यक्षा नगरपंचायत, श्री दाणेस साखरे नगरसेवक,श्री सागर आरेकर बांधकाम सभापती नगरपंचायत, सौ दिशा शहारे नगरसेविका नगरपंचायत, श्री प्रशांत नाकाडे, श्री सोनदास गणवीर,श्री दीपक सोनवणे, सौ किरण कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ निशा मस्के, सौ हर्ष राऊत युवती तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,सौ सुरेखा भोवते, सौ अनिसा पठाण, सौ सुनीता जैस्वाल, श्री युवराज तरोने सरपंच,सौ उषा वाढई, श्री शालिकराम हातझाडे,श्री नानाजी पिंपळकर व अर्जुनी/मोर. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री मुनीस्वर गेडाम यांनी निवेदन स्विकारले.