महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले ता ब्रम्हपुरी येथील वार्षिक निकाल जाहीर.

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले ता ब्रम्हपुरी येथील वार्षिक निकाल जाहीर.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०५/२३ महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथील वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.वर्ग निहाय प्रथम,द्वितीय तृतीय क्रमांक तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात येणा-या स्कालरशिप परिक्षेत वर्ग 5 मधून कु.परि अरविंद टिकले व कु.खुशी प्रफुल्ल ढोक पात्र ठरल्या तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS), वर्ग 8 मधून कु.मानसी दिगांबर बनकर व कु.जान्हवी योगेंद्र खोब्रागडे उत्तीर्ण झाल्या.


या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे सर यांचे हस्ते, श्री मस्के सर,श्री पुरी सर,श्री घ्यार सर, श्री सचिन क-हाडे सर, श्री गावडकर सर, श्री राजेश क-हाडे सर, कु.राऊत मॅडम यांचे उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महाले सर,आभार प्रदर्शन श्री,सडमाके सर यांनी केले, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !