निवडणूक कर्नाटक विजयाचा काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव : मुलचेरा
★ भाजपची उलटी गीणती सुरू.
विशाल बांबोळे - तालुका प्रतिनिधी मुलचेरा
मुलचेरा : काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक कोपरल्ली चेक चौकात ढोल- ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरे करण्यात आले.
वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार या सर्व गोष्टींना कंटाळून युवक, महिला, शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कर्नाटक निवडणुकीत मतदान केले आणि भ्रष्टाचारी भाजपला हद्दपार केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात सुद्धा उत्कृष्ट काम करत असतांना देखील भाजप ने धनशक्तीच्या जोरावर सत्ता बदल केले.
त्यामुळे जेनतेत भाजप प्रति रोष आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील आणि जिल्ह्यातील जनता भाजपच्या जातीय तेढ आणि धार्मिक राजकारणच्या मुद्याला दूर ठेवून, महागाई- बेरोजगारी सारख्या मुद्द्यांना घेऊन भाजपच्या खोटे आश्वासनांना बळी न पडता मतदान करनार व राज्यातून आणि जिल्ह्यातून, भाजपला हद्दपार करनार. भाजपची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवल्या शिवाय जनता शांत बसणार नाहीत. असे मत मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद गोटेवार यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी आनंद उत्सव साजरा करताना मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद गोटेवार, माजी तालुका अध्यक्ष रवी शाह, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम शेंडे, महिला काँग्रेस अध्यक्ष सुवर्णा येमुलवार, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुसेन हलदार व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.