कवी - श्री,अमरदीप प्रल्हाद लोखंडे यांच्या लेखणीतून...
!! बदल !!
(सदर कविता झाडीबोली भाषेत)
एस.के.24 तास
दिनांक,०४/०५/२३
सांग पाण्या तुझ्यासाठी
कोणते पीक घेऊ..?
कसा राहीन सदा सुखी
तुले मी का देऊ...? १
पावसाळ्याचा धान
हिवाळ्याचा कठाण
अति पाणी धुवारीनं
उन्हाळी ची दाणादान...२
पावसा सारख्या ढगाळ झळी
हा उन्हाळा हो का पावसाळा
नवीन तं सोळ जुना ही म्हणते
सकाळी वाटते हिवाळा...३
माणसाले घाम त फुटलाच नाही
लग्नामंधी वराळ्याले नाचू नाचू
नवरीच्या मांडवात नवरदेव जाता
उभ्यानं पडतेस ठेचू ठेचू...४
पाहुण्यांची दाना दान
मोठे वांदे खाण्याचे
झाकबेंड स्पीकर वाल्याची
आवाज बंद गाण्याचे...५
रोशनाई सोबत मोठा आवाज
ऐकून जाग्यात माणूस उळते
तर्क- वितर्क बांधून अंदाज
आता कोठीतरी विज पळते...६
अमक्या ठिकाणी कुटुंब मेले
शे-या, मेंढ्या, गाई ,भशी
बाहेर बाज टाकून झोपाची वेळ
सप्पा माणसाची मेली खुशी...७
असा पाणी पल्लाच नाही
अमदा उन्हाळ्यात का झाला
जगात एक नंबर देश माझा
वातावरण पक्ष बदलत गेला...८
निसर्ग म्हणते अरे माणसा
सरकार बदल माझ्यात बदल
लुच्चे गिरी, बेइमानी सोड
नाही त तुले घळवीन अद्दल
नाही त तुले घळवीन अद्दल..९
श्री,अमरदीप प्रल्हाद लोखंडे मु.पो.अ-हेरनवरगांव ता,ब्रह्मपुरी जिल्हा,चंद्रपूर मो.नं : ८३०८००५८६८