त्रिशरन फाउंडेशन पुणे व लॉईड्स मेटलच्या संयुक्त विद्यमाने "मी स्वाक्षरी करणार.!" या अभियानाला सुरवात.
एस.के.24 तास
एटापल्ली : त्रिशरन फाउंडेशन पुणे शाखा एटापल्ली व लयड्स मेटल च्या संयुक्त विद्यमाने गावा गावातील महिला व पुरुषांना अंगुठा वापरण्या ऐवजी सही करता यावी म्हणून गावातील Out Reach Center च्या अंतर्गत पेठा या गावात " मी स्वाक्षरी करणार....!" अभियान पंधरवडा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान श्री. शुभम गुप्ता सर उपविभागीय अधिकारी एटापल्ली, मा. प्रज्ञा वाघमारे मॅडम संचालिका त्रिशरण फाउंडेशन पुणे, मा. साई कुमार साहेब महा.व्यवस्थापक त्रिवेणी लॉईड्स मेटल कंपनी. मा. मंगल मशाखेत्री सर.जिल्हा समन्वयक. त्रिशरण फाउंडेशन पुणे.शाखा एटापल्ली,मा. वनिता कोरामी सरपंच. ग्रा. पं. तोडसा,मा.दस्सा कोरामी. गाव पाटील.पेठा यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरवात झाली.
मा.गुप्ता साहेब यांनी हा उपक्रम माझ्या स्वप्नात होता आणि मा.वाघमारे मॅडम यांनी आमच्या स्वप्नातील ऐकल आणि या उपक्रमाला आमच्या हातून सुरवत केल्यात व आपण आता सगळे स्वाक्षरी अभियान सहभागी होवून स्वाक्षरी करणार हे माझ्या साठी मोठी अभिमानाची बाब आहे. मी स्वाक्षरी करणार.!
हा उपक्रम शिक्षणाच महत्त्व काय असतो. स्वाक्षरी केल्याने काय सोपी होते. कोणत्याही काम अवघड जाता कामा नये. पहिल्यांदा,नवीन उपक्रम राबविण खूप गरजेचे होत आणि तो काम आज मॅडम नी केल्यात. म्हणून मी स्वाक्षरी करणार या अभियानात सर्व जण सहभागी व्हा.आज या कार्यक्रम सुरु झालं याच्या 15 दिवसानंतर पुन्हा मी आपल्या पेठा गावात येवू .. तेव्हा मात्र सर्वांना स्वाक्षरी करता आल पाहिजे.
पुढे मा. वाघमारे मॅडम बोलताना स्वाक्षरी महत्त्व काय असतो. त्या बाबतीत माहिती सांगताना वेगवेगळ्या निर्माण होणाऱ्या अडचणी, महिलांचे होणारे अत्याचार होऊ नये.आणि आदिवासी लोकांकरिता.लोन ची प्रॉफिट होऊ शकते. पण आपल्याल समजत नसते.
त्यामुळे इतर बाहेरचे लोक फायदा घेतात. फसवणुक करतात. तुमच्या जमीन, तुमच्या स्वरक्षण. आणि अन्य अत्याचार होऊ नये. तुम्ही स्वतःसाठी शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण घ्यायचं. आई शिकली तर, कुटुंब शिकतात, आई शिकली तर, मुलं शिकतील. प्रयत्न केले पाहिजे. शिक्षणात बसली पाहिजे अशा मार्गदर्शन केल्यात. सर्व प्रमुखांच्या मार्गदर्शना झाल्या नंतर.मा. एस गुप्ता सर यांच्या उपस्थित महिलांना व पुरुषांना.नोट पॅड आणि पेन,(chikky) वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम मान. श्री. प्रशांत वाघमारे राज्य प्रकल्प व्यवस्थापक व श्री. मंगल मशाखेत्री जिल्हा समन्वयक यांच्या नेतृत्वात पार पाडत असून या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी मंगेश दुर्वा,विनोद पदा,शेवंता नरोटी,वनिता पुंगाठी आउट रिच सेंटर हेडरी,पेठा मधील विकास दुत निशा शुक्ला,अमिषा पुंगाटी, शुभम कोरसामी,अमित लेखामी यांनी खुप परिश्रम घेतला.
या प्रसंगी या कार्यक्रमात संस्थेचे प्रशिक्षक संतोष कडवलवार, समीर राठोड, पद्माकर, अजय संगेंवार हे देखिल उपास्थित होते. या उपक्रमाबाबत गावातील महिलांनी आनंद व्यक्त केला. असुन आम्हाला ह्या उपक्रमाबाबत खूप उत्सुकता वाटत आहे असे प्रशिकणार्थीं अशिक्षित महिलांनी आपले मनोगत मांडले.उपक्रमाबद्दल महत्त्वची मुद्दे सांगितली.