लाखनी येथे ७२ व्या उर्स च्या वतीनं रक्तदान शिविर संपन्न.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : लाखनी येथे हाजी अहमद शाह (र.अ.)यांचा उर्स चा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे ८ में ला मोठ्या ऊत्साहात साजरा होतो . दरवर्षी प्रमाणे या वर्षी ऊर्स च्या निमित्ताने यंग मुस्लिम कमेटी च्या माध्यमातुन दरगाह परिसरात रक्तदान शिविर चा आयोजन करण्यात आला होता ज्यामधे मुस्लिम तरूण वर्गाने मोठ्या संख्येत उपस्थिति दर्शविली असल्याने भंडारा वैद्यकीय पथकाद्वारे एकुण २८ युनिट रक्तपिशव्या संकलन करण्यात आले.
राज्यातील रक्तताचा तुटवडा लक्षात घेता रूग्णांना वाचवण्यासाठी रक्ताची अत्यंत गरज असते. रक्त कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही,त्यामुळे रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे गरजेचे असते. या भुमीकेतुन हाजी अहमद शाह (र.ह.) यांच्या उर्स च्या निमित्ताने यंग मुस्लिम कमेटी च्या माध्यमातुन रक्तदान शिविर यशस्वी करण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यात मोहसिन आकबानी,परवेज आकबानी, नौशाद सय्यद,अस्पाक सय्यद,आवेश शेख,साजीद आकबानी,जमील अंसारी,सुफी शेख,बाबु शेख,अशरफ आकबानी,अरसलान शेख,दाऊद भुरा, यासीन सय्यद, सोहेल मेमण,जावेद लध्धानी सलीम पटेल अहमद बकाली आबिद सय्यद,मजीद मीठापाणी ईत्यादिंनी सहभाग घेतला.