महामानवांचे विचार पेरुन सर्वागीण विकासाचे धडे देणारे आदर्श शिक्षक व्हा. ★ मुन्नाभाई नंदागवळी यांचे प्रतिपादन कृतज्ञता समारंभ थाटात संपन्न.


महामानवांचे विचार पेरुन सर्वागीण विकासाचे धडे देणारे आदर्श  शिक्षक व्हा. 


★ मुन्नाभाई नंदागवळी यांचे प्रतिपादन कृतज्ञता समारंभ थाटात संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२६/०५/२३ आपण शिकतो, सुशिक्षित होतो पण खरे शिक्षणापासून वंचित राहतो, सर्वांगीण ज्ञानाची आज खूप गरज आहे, हे ज्ञान सामाजिक अनुभवातून मानवाला प्राप्त होते. याचा फायदा सर्वांनी घ्यावा. महापुरुषानुसार आपणही समाज घडविण्यासाठी शिक्षण घ्यावे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो महामानवांचे विचार आत्मसात करून सर्वांगीण विकासाचे धडे देणारे आदर्श शिक्षक व्हा असे प्रतिपादन आंबेडकरवादी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. ते निरोप समारंभ म्हणजे कृतज्ञता समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कमलेश वलथरे, चेतन सोनवणे, रोषना सिंहगडे, सौरभ मेश्राम व प्रविण मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक ठिकाणच्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाच्या छात्रध्यापकांनी कृतज्ञता समारंभ मालन सभागृह व गार्डन येथेआयोजित केला होता. 

उपस्थित सर्व छात्रध्यापकांनी स्वतः चे अनूभव व्यक्त केले, शिक्षण महाविद्यालयात घडलेल्या अनेक अनुभवांचा आनंद व्यक्त केला. काही छात्रध्यापकांनी स्वतः असलेले कला कौशल्यबाबतही मत मांडले. गीत, कविता आणि विचारही यावेळी सांगितले व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पूढे नंदागवळी म्हणाले- आपण शिकलेल्या शिक्षणाचे खरच समाजासाठी कसा फायदा करावा. त्याचा उपयोग हा प्रामाणिकपणे करावा. जेणेकरून समाजातील घटकांसाठी यश प्राप्त होईल. महाविद्यालयीन जीवन हे कलाटणी देणारे असते, मग कसे वळण घेते ते स्वतः ठरवायचे असते. असे मौल्यवान विचारही याप्रसंगी प्रतिपादन केले. 

समारंभाचे सुत्रसंचालन प्रगती शेंडे यांनी केले तर आभार यशपाल खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी योगेश निकुरे,अरविंद भेंडारकर, अंकिता रामटेके, पायल मेश्राम,आफरिन खान, दीक्षा पंचभाई,स्नेहा वागधरे,सोनाली खंडाळे, कांचन ठिकरे,किर्ती ठिकरे,निशा खोब्रागडे या छात्रध्यापकांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !