खेडी ते गोंडपिपरी रस्त्यासाठी युवक काँग्रेसचा चक्काजाम.

खेडी ते गोंडपिपरी रस्त्यासाठी युवक काँग्रेसचा चक्काजाम.


एस.के.24 तास


मुल : खेडी ते गोंडपिपरी रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट होत असून, कित्येक वर्षांपासून काम रखडलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास आले. सहन करावा लागत होता. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी युवक काँग्रेसकडून चांदापूर व घोसरी फाट्यावर रस्ता जाम करून आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच कार्यकत्यांनी संपूर्ण चक्काजाम करून,हा महामार्ग बंद पाडला होता, आंदोलनातील मागण्या मान्य करण्याचे ठेकेदार व संबंधित प्रशासनाचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


आंदोलनाच्या दरम्यान संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी, अभियंता चव्हाण,गुप्ता, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे,मूल पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव अजिंक्य प्रकाश पाटील, राकेशरत्नावार,राजू मारकवार, सुमित आरेकर, दशरथ वाकुडकर, दीपक पाटील वाढई, हिमानी वाकुडकर, घनश्याम येनुरकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून आंदोलनातील संपूर्ण मागण्या लेखी आश्वासन देऊन मान्य केल्या. 


आंदोलनात अजिंक्य प्रकाश पाटील मारकवार भाऊराव चुलबुले,अनिल निकेसर,अनिल मुलगेलवार,सुबोध बुग्गावार,प्रफुल्ल तिवाडे,ओम नागमकर,प्रशांत उराडे,पवन निलमवार,नांदगावचे सरपंच हिमाणी वाकुडकर,जालिंदर बांगरे व गावकरी सहभागी झाले होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !