कळमना येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात.
राजेंद्र वाढई!उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची 366 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी संभाजी महाराज यांच्या जिवनात घडलेल्या अनेक गोष्टींला उजाळा दिला. बहुजन समाजाताने मी पना, संकुचित विचार सोडून नव्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे असा संदेश दिला.
या प्रसंगी विचार पिठावर वक्ते लक्ष्मण घुघुल, सरपंच नंदकिशोर वाढई, लकुषणाजी भोयर जेष्ठ समाजसेवक, बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील, उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान देवस्थान कमिटी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र वांढरे यांनी तर आभार प्रदर्शन विनायक धांडे यांनी केले. कार्यक्रम मध्ये महीला बचत गट व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.