नागपुरातील लाज त्रिमूर्ती सामाजिक संस्थेच्या वतीने पद्मापुर (भुज) येथील महिलांना वेलो वाॅटर व्हिलचे वितरण.

 


नागपुरातील लाज त्रिमूर्ती सामाजिक संस्थेच्या वतीने पद्मापुर (भुज) येथील महिलांना वेलो वाॅटर व्हिलचे वितरण.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक, २९/०५/२३ ग्रामीण भागातील महिलांना आजच्याही काळात घरगुती दैनंदिन वापरासाठी व गुराढोरांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांपर्यंत जाऊन डोक्यावर पाण्याची  घागर मांडुन पाणी आणावं लागते. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महीलांना पाणी भरण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी नागपूर येथील लाॅज त्रिमुर्ती या सेवाभावी संस्थेच्या वतीने

 ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापुर (भुज), बल्लारपुर, एकारा, मेंडकी येथील महीलांना वेलो वाॅटर व्हीलचे वितरण करण्यात आले.

  वेलो वाॅटर व्हिल ची क्षमता ४५ लिटरची असुन त्यामध्ये पाणी भरून आपण सहजपणे हाताने ओढत नेऊ शकतो. जवळपास 1 लाख 73 हजार रुपयांचे साहित्य यावेळी वितरीत करण्यात आले आहे. सोबतच गावकऱ्यांना मिठाईचे सुध्दा वितरण यावेळी करण्यात आले. तर 12वीच्या परीक्षेत गावातुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला एक टॅब बक्षीस म्हणून देण्याची घोषणा देखील यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

लाज त्रिमुर्ती ही सेवाभावी संस्था समाजातील विविध सेवाभावी व्यक्तींनी एकत्र येत १९९२ मध्ये स्थापन केली आहे.या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवुन गरजूंना मदत केल्या जाते. मागील वर्षी ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.


सदर कार्यक्रमाला संस्थेचे मास्टर नवीन झकार, संस्थेचे सचिव तरुण मेहरा, समन्वयक तरुण श्रीवास्तव, संस्थेचे सदस्य अनुक्रमे डॉ.अरुण चतुर्वेदी, रोहित जैन, विनय झाडे, नरेश अग्रवाल,अनुज शर्मा,मुकेश आहुजा, अवनीकांत वर्मा,सतीश लद्धाड, किशोर नाईक, जयवंत करपाते, अनील श्रीवास्तव, दिलीप नारंग, सरपंच शालु रामटेके हे उपस्थित होते.


यशस्वीतेसाठी जयंत श्रीवास्तव,न.प.माजी उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव,पत्रकार राहुल मैंद,विनोद उपासे,विशाल श्रीवास्तव,  वैभव श्रीवास्तव,माणिक थोरकर,तुळशिराम मेश्राम,पुंडलिक झोडे,बाळकृष्ण साखरे,नागोजी मस्के, ज्ञानेश्वर मस्के,आशाताई धानोरकर,यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला महिलांची व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !