जन्मदिवसाच्या निमित्ताने मैत्रिणीला "सॅनिटरी पॅड"ची अनोखी भेट. " साहस " विद्यार्थिनींचा परिवर्तनशील उपक्रम.

जन्मदिवसाच्या निमित्ताने मैत्रिणीला "सॅनिटरी पॅड"ची अनोखी भेट.


" साहस " विद्यार्थिनींचा परिवर्तनशील उपक्रम.


एस.के.24 तास


मोहाळी दि. २४ मे:  मोहळी येथील साहस उपक्रमाच्या विद्यार्थिनी सेजल नन्नावरे, पायल चौखे, आचल चौखे या १२ वित शिकत आहे.  या विद्यार्थिनींनी आपल्या पूजा भोयर या मैत्रिणीला जन्मदिवाच्या निमित्ताने भेटवस्तू म्हणून चक्क सॅनिटरी पॅडची भेट दिली. विद्यार्थिनींनीच्या या कृतीने स्त्रियांची समस्या असलेल्या मासिक पाळीला एक प्रकारे सन्मानच मिळून दिलेला आहे.

ब्राईटएज फाउंडेशन द्वारा मुलींसाठी साहस या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मुलींना कराटे स्वरक्षणाचे धडे,स्त्री विषयक कायदे, स्त्रियांच्या समस्या व उपाय अश्या विविध विषयांवर तज्ञ प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण दिल्या जाते.सोबतच प्रशिक्षण दिल्यानंतर मुलींना स्वतःच्या,कुटुंबाच्या किंवा समाजातील एखाद्या समस्येवर काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले जाते. यासाठी मार्गदर्शक शंकर भरडे यांच्या संकल्पनेतून "साहस- करके देखो" हा कृतिकार्यक्रम राबवण्यात येत आहे. यावर्षी १०० मुली साहस शिबिरात सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ३५ मुली "साहस- करके देखो"  या कृतियुक्त उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. यातील अनेक विद्यार्थिननींनी विविध कृतिशील कार्यक्रम सुरु केले आहेत.

त्यामध्ये सेजल नन्नावरे,पायल चौखे व आचल चौखे या विद्यार्थिनींनी स्त्रियांच्या मासिक पाळी या समस्येवर काम करण्याचे व जनजागृती करायचे ठरवले होते. कारण आजही स्त्रीच्या मासिक पाळीला समाजात घृणास्पद स्थान आहे. त्यामुळे मुली घरी कुटुंबीयांसोबत त्यावर साधी चर्चाही करण्याचे धाडस करत नाही. तसेच सॅनिटरी पॅड हा लज्जेचा विषय मानतात. म्हणून कुठेतरी लपवून ठेवतात. परंतु या मुलींनी सर्व कुटुंबीयांसमोर स्वतःच्या मैत्रिणीला  जन्मदिवसानिमित्ताने भेटवस्तू म्हणून चक्क सॅनेटरी पॅड भेट म्हणून देण्याचे साहस केले. मुलींनी मुलींसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच इतर उत्सव कार्यक्रमांमध्ये नेमकी काय भेट द्यायची याचा वेगळा पायंडा निर्माण केला आहे.


तसेच प्रिया नागोसे,किरण दडमल,जानू शेरकुरे, अश्विनी नन्नावरे, कोमल गरमडे,साक्षी नन्नावरे या विद्यार्थिनींनी गावात कराटे व स्वरक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.तसेच किरण दडमल व राणी जीवातोडे या मुलींनी विधवा घटस्फोटीत परीतक्त्या महिलांसाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व मुलींचे साहस संयोजक विलास चौधरी व ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष,श्रीकांत एकुडे यांनी कौतुक केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !