ने.हि.विदयालय " माजी विदयार्थी मेळावा.२०२३" थाटात संपन्न.

ने.हि.विदयालय " माजी विदयार्थी मेळावा.२०२३" थाटात संपन्न.


माजी,मंत्री विजय वडेट्टीवार, शोभाताई फडणविस,आ.सुधाकर अडवाले यांची उपस्थिती व मार्गदर्शन.


शालेय स्तरावरील नागपूर विभागातील पहिला विदयार्थी मेळावा. 


एस.के.24 तास


नागभिड : उकंठा लागून असलेला शालेय स्तरावरील ने.हि.विदयालय नवेगाव पांडव येथील माजी विदयार्थी व विद्यार्थिनी मेळावा अतिशय दिमाखात राष्ट्रसंत विचार मंचावर २५० विदयार्थी व परिवारासह ५० वर आजी माजी शिक्षकाच्या उपस्थिती संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ने.हि.शिक्षण संस्थेचे सचिव,अशोकजी भैया,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार, शोभाताई फडणविस,शिक्षक आमदार,सुधाकरराव अडबाले,मेळावा संयोजक प्रा.महेश पानसे,सरपंच अँड,शर्मिला रामटेके उपस्थित  होते.

एन.सी.सी.पथसंचालनाने सर्व अतिथिंना विचार मंचावर आणण्यात आले.दोन सत्रात संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन माजी मंत्री,विजय वडेट्टीवार व शोभाताई  फडणविस यांनी केले.स्वर्गीय शिक्षक,विदयार्थी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर विद्यार्थिनी चमूनी स्वागत गित सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.


आयोजन समिती तर्फे शाल,श्रीफळ,फुलगुच्छ व आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन आतिथींचे स्वागत माजी विदयार्थी व विद्यार्थिनी यांचे हस्ते करण्यात  आले. माजी विदयार्थी  मेळावा संयोजक  महेश पानसे  यांनी प्रास्ताविक करून आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.नवनियुक्त शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचा शाळा,संस्था,ग्रामपंचायत व माजी विद्यार्थी यांचे तफै भव्य सत्कार करण्यात आला.

प्रा,महेश पानसे संपादित"स्नेहछटा" या मेळावा स्मरणीकी चे प्रकाशन करण्यात आले.प्रथम सत्रात मान्यवर अतिथींचे हस्ते क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर चमकलेले माजी विदयार्थी अनिल मांडवकर,उदयोग क्षेत्रातून रविकिरण सहारे,कृषी क्षेत्रातून नवनाथ नवघडे यांना विदयालया तफै गुणवंत पुरस्कार देणयात आला तर प्रा.महेश पानसे,डडॉ.विठ्ठल  बोरकुटे,सुबोध दादा यांनी सेवाभावी व उल्लेखनीय  कार्यासाठी सेवाव्रती सन्मान देऊन गौरविण्यात आले.


१९६० पासून शिक्षकपदावर कार्यरत ४० वर  शिक्षकवुदांना मान्यवरांचे हस्ते विशेष उपहाराने सन्मानीत करण्यात आले.विशेष म्हणजे या मेळाव्यात गेली ४० ते ४५ वर्ष दुरावलेल्या विदयार्थी व विद्यार्थिनीची झालेली भेट अतिशय आनंदपूर्ण व भावनिक होती.सारे विदयार्थी गदगद झाले होते.


आमदार सुधाकरराव अडबाले,आमदार विजय वडेट्टीवार व शोभाताई फडणविस यांनी अतिशय  प्रभावीपणे संवाद साधून या शालेय स्तरावर संपन्न झालेल्या माजी विदयार्थी मेळाव्याचे नियोजन,मांडणी व देखणेपणाचे कौतुक करीत बालपणातील आठवणींना उजाळा दिला.सरपंच अँड,शर्मिला रामटेके यांनी होतकरु विदयार्थी  घडविण्यात ने.हि.विदयालयाचे योगदान विषद केले. 


आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव  अशोकजी भैया यांनी शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीत माजी विदयार्थी व विद्यार्थिनी  यांचा सहभाग स्पष्ट करीत या नाविण्यपूर्ण  मेळाव्याचे भरभरून  कौतुक केले.दुपारचे भोजनानंतर शाळेचे माझी शिक्षक निवृत्त शिक्षणाधिकारी शिशीरबाबा घोनमोडे यांचे अध्यक्षतेखाली दुसरे सत्र पार पडले.


यावेळी प्रमुख आतिथी  म्हणून माजी विदयार्थी तथा निवृत्त उपसंचालक आरोग्य विभाग डॉ.गणेश रामटेके,माजी विदयार्थी तथा निवृत्त संचालक डॉ.शिवनकर,माजी विदयार्थी प्राचार्य लेमराज लडके हे होते.या सत्रात संपुर्ण माजी विदयार्थी  व विद्यार्थिनी यांना स्मृतीचिन्ह,ग्रामगिता व स्मरणिकेचे वितरण करण्यात आले.संपुर्ण  मेळावा  दरम्यान नियोजन,शिस्त व व्यवस्था कोतुकास्पद होती.सकाळी नोंदणी,अल्पोपहार व दुपारचे जेवन अशी संपुर्ण  व्यवस्था करण्यात आली.


सुंदर संचालन सतिष डांगी व शिक्षक कुथे यांनी केले. शाळा प्रभारी नरेंद्र चुऱ्हे व शिक्षकवृंद यांनी माजी विदयार्थी मेळावा  समितीला संपुर्ण सहकार्य केले.दोन्ही सत्रात अनेक माजी विदयार्थी व विद्यार्थिनी  यांनी मनोगत मांडले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !