डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम ची सभा उत्साहात.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र जिल्हा शाखा भंडारा ची त्रैमासिक सभा उत्साहात पार पडली. यात काही तालुका व जिल्हा स्तरीय कार्यकारिणी सदस्यांना बढतीचे सभाध्यक्षाच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तर वाकेश्वर ग्रामपंचायतीत सर्व साधारण प्रवर्गातून अनुसूचित जातीचे सरपंच पदी लूहास गोंडाणे विराजमान झाल्या प्रीत्यर्थ त्यांचा समाजकल्याण सभापती मदन रामटेके यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा शाखा भंडारा ची त्रैमासिक सभा विश्राम गृहात नुकतीच पार पडली. अध्यक्ष स्थानी प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष अरुण गोंडाणे, जिल्हा महासचिव कैलास गेडाम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती टेंभूर्णे, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रवींद्र वानखेडे, आशित बागडे, प्रेमसागर गणवीर, सामाजिक कार्यकर्ता डी. वाय. बडोले,
सूर्यकांत हुमने, प्रसिद्धी प्रमुख कालिदास खोब्रागडे, साकोली तालुका अध्यक्ष किशोर तरजुले, ओबीसी आघाडी अध्यक्ष सुरेश मेश्राम, उपाध्यक्ष अरविंद कठाने, भंडारा तालुका कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण थुलकर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माटे, तुमसर तालुका महिला आघाडीच्या रीना माटे, दर्शना माटे, साकोली शहर अध्यक्ष सोनू राऊत, लाखनी तालुकाध्यक्ष अरविंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मेश्राम, लुहास गोंडाणे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभेत सामाजिक संघटन, बौध्द समाज आणि आजची राजकीय स्थिती, संघटना वाढ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कोषाध्यक्ष प्रवीण थुलकर यांना जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, डॉ. रवींद्र वानखेडे जिल्हा सदस्य पदावरून विदर्भ प्रदेश सदस्य तर रीना माटे यांना तुमसर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदावर बढती देण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच लुहास गोंडाणे यांचा सोशल फोरम चे वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सभेचे संचालन व प्रास्ताविक महासचिव कैलास गेडाम तर आभार डॉ. प्रवीण थुलकर यांनी मानले. सभेला सोशल फोरम चे जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.