देवापूर रिठ तलावाची जमिन अतिक्रमण धारकांना अधिकृतपणे वास्तव्यासाठी द्या. -वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

देवापूर रिठ तलावाची जमिन अतिक्रमण धारकांना अधिकृतपणे वास्तव्यासाठी द्या. -वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.


विजय नरचुलवार - प्रतिनिधी गडचिरोली 


गडचिरोली : देवापूर रिठ येथिल तलावाच्या जमिनीवर गेल्या तिन वर्षापासून अतिक्रमण करून झोपड्या बांधून वास्तव्य करीत असणा-या  नागरिकांना सदर जागा अधिकृतपणे देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील शेकडो अतिक्रमण धारकांच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिका-यांमार्फत  पाठविलेल्या निवेदनातून केली.सदर शिष्ठमंडळाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे,  तालुकाध्यक्ष बाशिद शेख,शहराध्यक्ष दिलीप बांबोळे यांनी केले.


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सिंचन विभागाने शेतीसाठी पाणी पूरवठा करण्यासाठी देवापूर रिठ सर्वे नंबर ७८ येथे तलावाची निर्मीती केली होती.परंतु शेतक-यांनी आपापल्या शेतीत प्लाट पाडून विक्री केल्याने व संपूर्ण शेतीच्या परिसरात नागरिकांनी घरे बांधली असल्यामूळे सदर परिसरातील ग्रिन बेल्ट संपूष्ठात आले,त्यामूळे तलावाची गरजच राहिली नाही,


 तलावातील जमिनीवर ग्रामिण भागातून  काम धंदा,रोजी रोटी करून उदर निर्वाह  करण्यासाठी आलेल्या तिनशेवर बेघर नागरिक गेल्या तिन वर्षापासून अतिक्रमण करून झोपड्या बांधून वास्तव्य करीत होते परंतु नगर परिषद व तहसिल प्रशासनाने सदर अतिक्रमणधारकांच्या झोपड्या  तोडून फोडून वहिवाटीच्या सामानाची नासधूस केल्यामूळे अतिक्रमण धारकांवर निवा-याचे व उपासमारीचे  मोठे संकट निर्माण झाले आहे. 


त्यामूळे राज्य सरकारने देवापूर रिठ येथिल अतिक्रमण धारकांची दखल घेऊन सदरची जमिन प्रत्येकी पंधराशे स्केअर फुट प्रमाणे उपलब्ध करून द्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे.उपरोक्त मागणी तात्काळ मान्य करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व अतिक्रमण धारकांना सोबत घेऊन तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे.


या शिष्ठमंडळात वंचितचे जावेद शेख,भारत रायपूरे, शकुंतला दुधे, सोनम साळवे, वासुदेव मडावी, धम्मदिप कोटांगले, वंदना येडमे, शिल्पा दर्रो, श्वेता बोरकुटे, शोभा शेरकी, स्मिता संतोषवार, सुजाता वासनिक यांच्यासह शेकडो अतिक्रमण धारकांचा समावेश होता.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !