अर्वाचीन साहित्य प्रयोजनावर चर्चा : ने.हि.महाविद्यालयात उपक्रम.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०८/०५/२३ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी विभाग व संशोधन केंद्र आयोजित पदव्युत्तर विभागाच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे औचित्य साधून विभागातील डॉ पद्माकर वानखेडेंनी अर्वाचीन साहित्य प्रयोजनावर चर्चा घडवून आणली.साहित्यनिर्मिती करण्यामागचा हेतू त्यांनी सचित्र दाखवून साहित्य प्रयोजनाचा उद्देश स्वप्नरंजन, आत्माविस्कार,अर्थप्राप्ती,उद् बोधन,प्रचार,जिज्ञासापूर्ती, विरेचन इ.प्रयोजने लेखक व वाचकाच्या संदर्भात आहेत,हे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी. एच. गहाणे होते तर प्रमुख उपस्थितीत डॉ राजेंद्र डांगे, विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर, डॉ प्रकाश वट्टी उपस्थित होते.यावेळी पाहूण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ धनराज खानोरकरांनी तर संचालन व आभार वैष्णवी भालेराव हिने केले. यशस्वीतेसाठी विभागातील प्रा,माधव चुटे,प्रा,अस्मिता कोठेवार,प्रा प्रशांत राऊत व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.