चंद्रपुर ग्रामसेवक सहकारी पत संस्था निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणदणीत विजय.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
चंद्रपुर : जिल्हातील ग्रामसेवक सहकारी पत संस्थेच्या झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत प्रगती पॅनल चे दनदनित विजयी संपादन केले आहे.विजयी झालेल्या उमेदवारा मध्ये प्रगती पॅनल चे उमेदवार श्री.मुन्ना सिडाम,गोपाल नैताम,युवराज वेस्कडे,किशोर धकाते,रमांकत गुरनुले,सुनिल जाधव,राजेश काबळे, प्रेमदास राठोड,सौ.भावना भनारकर, सौ. मंजुषा कुभमवार,सर्वाधीक मतानी विजयी संपादन केले आहे तर परीवर्तन पॅनल कडुन श्री.प्रकाश खरवडे,कैलास फुलझले,आशिष चत्रेश्वार,प्रफुल गेडाम, नरेश कसारे हे निवडुन आले आहे आणि वंचित पॅनल कडुन एकही उमेदवार विजयश्री खेचून आणली नाही.
प्रगती पॅनलच्या विजयीश्री संपादन करण्यात श्री, विजय यारेवार आणि श्री शैलेश साहारे व इतर प्रगती पॅनलच्या हितचितकांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.