चंद्रपुरात सत्य शोधक विवाह सोहळा संपन्न.
राजेंद्र वाढई!उपसंपादक
चंद्रपुर : येथील बालाजी वार्ड, महात्मा फुले सभागृहात,दि.2 मे 2023 रोजी सत्य शोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला.
सत्य शोधक नितेश लताबाई पत्रुजी तुळसीराम मेश्राम रा.ठाणेगाव ता. आरमोरी जि.गडचिरोली व सत्य शोधीका अश्विता सविताबाई विनोद नानाजी डुंबरे रा.लालपेठ चंद्रपुर.नितेश व अश्विता यांनी समाजातील अंधश्रद्धा व पारंपारिक विचारांना नाकारत क्रांति सुर्य महात्मा फुले व क्रांति ज्योती सावित्रीआई फुले यांनी सांगितलेल्या सत्य शोधक विचारांचा स्विकार करत आपले विवाह सत्य शोधक पद्धतीने लावत समाजाला नवी दिशा दिली त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
या विवाहाचे विधी कर्ते व मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते,ओमकांत उपरीकर लाखांदुर,भुजंग पात्रीकर (इंजेवारी)आरमोरी व रूचिक बारस्कर (चोप) वडसा यांचे मार्गदर्शनात विवाह सत्य शोधक पद्धतीने पार पडला.या विवाह प्रसंगी दोन्ही कडील आप्त परीवार, मित्र परीवार इत्यादी नातलग मंडळी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.