रुई ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नरेंद्र नागमोती विजयी.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१९/०५/२३ दिनांक 18 मे रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील रुई ग्रामपंचायत मध्ये एका जागेसाठी पोट निवडणूक पार पडली. यासाठी दोन उमेदवार रिंगणात होते त्यात भारतीय जनता पार्टी विकास पॅनल मधून छत्री हा चिन्ह घेऊन पालकदास हरी ढोंगे तर काँग्रेस पुरस्कृत विकास पॅनल मधून नरेंद्र उर्फ किरण दिगांबर नागमोती यांनी कपबशी हा चिन्ह घेऊन निवडणूक लढविली. त्यामध्ये काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे किरण नागमोती यांनी भाजपा समर्थित पॅनेलचे पालकदास ढोंगे यांचा 109 मतांनी पराभव करीत विजय मिळवला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे. या अगोदर सदर जागेवरील विजयी उमेदवार ज्ञानेश्वर महादेव बुल्ले यांच्ये आकस्मित निधन झाल्यामुळे त्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. अगोदरच रुई या ग्रामपंचायत वर काँग्रेस पुरस्कृत विकास पॅनलचे वर्चस्व होते. त्यात आणखी एक उमेदवार विजयी झाल्याने सध्या गावाची सत्ता ही काँग्रेस गटाकडे आहे.