★ सामाजिक कार्यकर्ता मानबिंदु दहिवले यांचा आंदोलनाचा इशारा.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : शासनाचा गाव तिथे रस्ताचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून दखल घेण्यात येते पण जंगलव्याप्त रस्त्याकडे दूर्लक्ष केला जात आहे. त्यात पारडी,मुर्झा, झरी, मुरमाडी, दहेगाव हे गाव जंगलव्याप्त गाव असुन ह्याच मार्गानी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु शासनच ह्या जंगलव्याप्त गावाकडे दुर्लक्ष करित असल्याने ये जा करने अवघड झाले आहे. ये जा करित असतांना हिंसक पशुप्राणी रस्त्यानी फेरफटका करीत असल्याने वाटसरुना जिव मुठित ठेवुन प्रवाश करावा लागत आहे.
हा परिसर जंगलव्याप्त असल्याने जंगली प्राणी राजरोशपणे फिरकत असतात.रस्त्याची दुर्दशा झाली असुन संपुर्ण गिट्ठी उखडलेली अाहे. त्यात मुर्झा ते तिडका रस्त्याच्या डाबरीकरणाची गेल्यापाच वर्षापासुन मागणी केली पण शासणाचे प्रतिनिधी जाणुन बूजुन टाळाटाळी करीत असल्याचे चिञ जाणवत आहेत .रस्त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता मानबिंदु दहिवले यांनी दिला.
या परिसरातील मजूरवर्ग,शालेय विद्यार्थि शिक्षणाकरिता जवळ असलेल्या रेल्वेच्या माध्यमाने गोंदिया, बल्लारपुर, चंद्रपुर व रायपुरला शेतमाल विकण्याकरिता व्यावसायिक खरेदी विक्रीकरीता ह्याच जंगलव्याप्त मार्गाने ये जा करित असतात. तरी शासनाने जनतेच्या समस्याची दखल घेवुन लवकरात लवकर डांबरीकरण करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता मानबिंदु दहिवले यांनी निवेदना द्बारे केली आहे.