ने.हि.शिक्षण संस्थेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे. - अशोक भैया.

ने.हि.शिक्षण संस्थेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे. - अशोक भैया.


एस.के.24 तास


नागभिड : राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज यांचे पावन हस्ते ने.हि.शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ  रोवल्या गेली.शिक्षण क्षेत्रात सर्वपरिचीत असलेल्या या संस्थेच्या प्रगतीत इथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या माजी विदयार्थी  यांचे योगदान फार मोठे असून, इथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या,उच्च  पदावर विराजमान झालेल्या विदयार्थी यांचेमुळे संस्थेचे नावलौकिक झाले असल्याचे मत ने.हि.शिक्षण संस्थेचे सचिव  अशोकजी भैया यांनी व्यक्त केले.


ते ने.हि.विदयालय माजी विदयार्थी व विदयाथिंनी भव्य मेळाव्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.या मेळाव्याचे उदघाटन माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार, शोभाताई फडणविस हे होते तर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार आ.सुधाकरराव अडवाले,संयोजक  महेश पानसे, नवेगाव पांडव च्या सरपंचा शर्मिला रामटेके  यावेळी उपस्थीत  होते.


नेवजाबाई हितकारिणी संस्थेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा समाजोपयोगी विचार अंगीकारूनच परिसतातील हजारो विदयार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविदयालय स्तरावर शिक्षणाची दारे उपलब्ध करून दिली व दर्जेदार शिक्षणाची बांधिलकी जोपासली. विदयार्थ्यांनी सुद्धा अनेक क्षेत्रात भरारी मारून संस्थेचे नाव मोठे केले. यापेक्षा दुसरे मोठे समाजहित नसल्याचे अशोक भैया यांनी स्पष्ट केले.


ने.हि.विदयालय  नवेगाव पांडव येतील माजी विदयार्थी यांनी शालेय स्तरावर आपल्या शिक्षकांसह आयोजीत केलेल्या भव्य मेळाव्याचे कौतुक करून हा मेळावा संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.याप़संगी माजी गुणवंत विद्यार्थी, आजी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व माजी विदयार्थी  यांनी शाळेला दिलेल्या हितोपयोगी वाटरकुलरचे उदघाटन अशोक भैया यांचेसह माजीमंत्री आ.वडेट्टीवार,शोभाताई फडणविस, आ.सुधाकरराव अडवाले यांनी केले.


 दोन सत्रात संपन्न झालेल्या या भव्य मेळाव्याचे आयोजन शाळा परिसरात खास तयार करण्यात  आलेल्या राष्ट्रसंत  विचारमंचावर करण्यात आले होते.सुंदर संचालन शतिष डांगे व मुनिराज कुथे या शिक्षकवृंदानी केले.या मेळाव्याकरीता आयोजन समितीसह शाळा व्यवस्थापण, ग्रामपंचायत यांनीही पुढाकार घेतला होताहे विशेष.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !