रणमोचन येथील त्या दोन युवकांच्या समय सूचकतेने वाचले अपघातग्रस्त इसमाचे प्राण.
बेटाळा (किन्ही) जवळील ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील घटना.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१५/०५/२३ ब्रह्मपुरी - आरमोरी रोडवरील राष्ट्रीय महामार्गावरील बेटाळा (किन्ही ) पॉलिटेक्निक कॉलेज जवळ दिनांक १४ मे २३ रोजी सायंकाळी ५ -३० च्या सुमारास ब्रह्मपुरी वरून सींदेवाही मार्गाने स्वतःच्या गावी मोटार सायकलने भरधाव वेगात परत जात असलेल्या इसमाचा अचानक मोटार सायकल वरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या छोट्या डिव्हायडरला मोटार सायकल आदळून अपघात घडला.
त्यात एक ४७ वर्षीय ईसम जखमी झाला असून त्याला वेळीच ब्रह्मपुरीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून भारत पंचभाई राहणार वाकल (तालुका सिंदेवाही) असे अपघातातील जखमी इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सदर इसम हा सींदेवाही तालुक्यातील वाकल गावातील रहिवासी असून तो सींदेवाही तहसील प्रशासनाच्या विभागात कोतवाल म्हणून काम करीत असल्याची विश्वासनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दिनांक १४मे २३ रोजी रविवारला तो काही कामानिमित्त ब्रह्मपुरीला आला होता. मात्र तो स्वगावी मोटार सायकलने गावाकडे परत जात असतांना ब्रह्मपुरी आरमोरी रोडवरील बेटाळा किन्ही जवळील पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेट समोर असलेल्या बाजूच्या डिव्हायडरला मोटार सायकल आदळल्याने अपघात घडला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.मात्र तो काही काळ रस्त्याच्या कडेला पडून होता. तरी रस्त्याने जाणारे- येणारे प्रवासी त्याच्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करत होते.
मात्र रणमोचन येथील कमल संगत साहेब आणि रितेश राऊत हे दोन्ही युवक गावाकडून ब्रह्मपुरी कडे जात होते. त्यांना समोर अपघाती व्यक्ती पडून असल्याचे दिसले. वेळीच सामाजिक औदार्य दाखवत त्याला तातडीने ब्रह्मपुरीतील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती केले व त्याबद्दलची माहिती अपघातग्रस्तांच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला देण्यात आली आहे.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहेत.