वन विभागाने दोन कोल्हांना दिले जीवदान.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
पिंपळगाव (भोसले)/ब्रह्मपुरी : दिनांक,१६/०५/२३ तालुक्यापासून नऊ किलोमीटर असलेल्या पिंपळगाव (भोसले) येथे काल रात्रोच्या सुमारास श्री रमेश कुथे यांच्या अगदी गावालगत लागून असलेल्या शेतातील विहिरीत दोन कोल्हे पडले होते.
ही बाब आज दुपारी जवळपास दीड ते दोनच्या सुमारास कोल्हाच्या ओरडण्याने उघडकीस आली. तप्त उन्हाच्या लाईने त्रस्त झालेले कोल्हे विहिरीत ओरडू लागले.विहिरीत कोल्हे ओरडण्याचा आवाज ऐकून पिंपळगावच्या पेठ वार्डातील गावकरी विहिरीजवळ जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी दोन कोल्हे त्यांना पडलेले दिसले तेव्हा लगेचच निहाल भास्कर टिकले यांनी वन विभागाशी संपर्क साधला व घटनेची सविस्तर माहिती दिली.
वनविभागाची चमू तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दोरखंडाला पिंजरे बांधून पिंजरे विहिरी टाकले आणि कोल्हांना विहिरीबाहेर सुखरूप काढून त्यांना बाहेर नेऊन सोडून दिले जर वन विभागाची चमु घटनास्थळी तात्काळ पोहोचली नसती तर विहिरीच्या पाण्यात त्या दोन कोल्यांचा मृत्यू झाला असता अशी गावामध्ये चर्चा सुरू होती.