ग्रामपंचायत देलनवाडी येते अयोग्य व्यक्तीची निवड करून ग्रामसेवक हे मानधन काढत आहेत.


ग्रामपंचायत देलनवाडी येते अयोग्य व्यक्तीची निवड करून ग्रामसेवक हे मानधन काढत आहेत.


एस.के.24 तास


आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येतील पाणी पुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी ग्रामपंचायत देलनवाडी यांची नियुक्ती झाल्यापासूनच हि नियुक्ती पासूनच वादग्रस्त होती.सुनिल तागडे यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारामध्ये मा. सवर्ग विकास अधिकारी आरमोरी यांना ग्रामपंचायत देलनवाडी येतील पाणी पुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी यांना मानधन देण्यात येत आहे कि नाही, असे विचारले असता. पंचायत समिती आरमोरी या कार्यलयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे मा. विस्तार अधिकारी (पंचायत विभाग) आरमोरी यांनी दिली आहे. तसेच सोबतच ग्रामपंचायत देलनवाडी येतील ग्रामसेवक यांनी  पाणी पुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी यांना मानधन देण्यात येत आहे, असे माहितीच्या अधिकारामध्ये सांगितले आहे.


एकाच वेळी मा. सवर्ग विकास अधिकारी आरमोरी आणि ग्रामपंचायत सचिव यांच्या कडून मिळालेल्या माहितीमध्ये खुप मोठया प्रमाणात तफावत असून ती अन्याय कारक आहे.


ग्रामपंचायत देलनवाडी चे ग्रामसेवक हे ग्रामपंचायत च्या स्ववनिधी मधून पाणी पुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी यांचा मानधन जवळपास 14 हजार रुपये काढत आहेत. आणि जिल्हा परिषद मार्फत देण्यात येणारा जो ऑनलाईन मानधन तो सुध्दा ग्रामपंचायत देलनवाडी च्या स्वनिधी मधून असा एकूण 100% मानधन ग्रामपंचायत देलनवाडी चे ग्रामसेवक काढत आहेत.


ग्रामपंचायत देलनवाडीकडे नळाचा पाईप लाईन फुटली तर दुरुस्ती साठी, गावामध्ये लाईट,नाल्या उपसण्याकरिता पैसे राहत नाही.  आणि ग्रामसेवक यांनी पाणी पुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी यांचा मानधन ग्रामपंचायत च्या स्वनिधी मधून आजपर्यत जवळपास 5 लाख रुपये मानधन स्वरूपात दिलेले आहेत.


पाणी पुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी यांची शासन व कोर्ट मध्ये तक्रार आहे. तरी पण ग्रामपंचायत देलनवाडी चे ग्रामसेवक हे मानधन काढत आहेत.ते त्वरित बंद करण्यात यावे.अशा प्रकारची तक्रार आज पर्यत 3 वेळा मा.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कडे तक्रार केलेली असून, कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच ग्रामपंचायत देलनवाडी चे ग्रामसेवक यांच्या वर कायदेशीर कार्यवाही करण्यात याव्ही. अशी तक्रार मा.जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,मा.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली,मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पंचायत विभाग )जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कडे  - सुनिल तागडे यांनी केली आहे.




आतापर्यंत पाच लाख अदा : - 

गावातील गाळ उपसा तसेच फुटलेली तळ पाइपलाइन दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतकडे पैसे, असे सांगितले जाते तर दुसरीकडे अयोग्य व्यक्तीची नियुक्ती करून त्याचे मानधन काढले जात आहे. पाणीपुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी यांची नियुक्तीच वादग्रस्त व न्यायालयीन प्रक्रियेत असतानासुद्धा मानधनापोटी ग्रामपंचायतच्या स्वनिधी मधून पाच लाख रुपये देण्यात आले.



देलनवाडीतील पाणीपुरवठा व दिवाबत्ती कर्मचायाची पदभरती माझ्या कार्यकाळात झाली नाही. सदर पदभरतीचा युक्तिवाद न्यायालयीन प्रक्रियेत आहे. पाणीपुरवठा कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये नियमित काम करत असल्याने कामाचा मोबदला म्हणून मला त्याचा मानधन देणे अनिवार्य आहे.

- प्रशांत डोंगरवार,ग्रामसेवक, देलनवाडी

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !