गावच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारा पुढे वाचली घराच्या पडझडची व्यथा!
★ पालांदूर व कवलेवाडा येथे घरांची मोठी नुकसान ; पंचनामे करण्याचे आदेश.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : लाखनी तालुक्यातील पालांदुर परिसरात 2 मे2023 ला मंगळवारच्या सायंकाळी आलेल्या चक्रीवादळात कच्च्या घरांचे मोठे नुकसान झाले. कित्येक घरांचे छत शेकडो फूट अंतरावर उडाले. त्यामुळे कित्येकांना बेगर होऊन निवारा शोधण्याची वेळ आली. ही आपबिती सरपंच लता कापसे पालांदूर, उपसरपंच पंकज रामटेके व सरपंच मनीषा खंडाईत कवलेवाडा तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार महेश शितोळे यांच्यापुढे व्यथा व्यक्त केली.
डोक्यावरचे छत उडाल्याने निराश्रीत झालेले कुटुंब रस्त्यावर आले आहेत. त्यांचा पोटाचा चारा सुद्धा प्रभावित झाल्याने समस्या उभी झाली आहे. अशा कठीण प्रसंगात शासन व प्रशासनाने तत्परतेने न्याय द्यावा अशी कडकडीची विनंती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचे प्रथम अधिकारी महेश शितोळे यांच्याकडे व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार महोदयांनी संबंधित तलाठी यांना सूचना देऊन तत्परतेने पंचनामे करण्याचे आदेश दिले. याकरिता ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
माझ्या राहत्या घराचे संपूर्ण टीनाचे पत्र उडाल्याने मी उघड्यावर आलो आहे.तेव्हा कृपया पंचनामा करून मला तातडीची मदत शासन व प्रशासनाने करावी. - काशिनाथ खंडाईत,पालांदूर