विद्यार्थ्यांनी केले झाडीबोलीतील उखाणे म्हणींचे संकलन ; मराठी विभागाचे उपक्रम.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : ११/०५/२३ " झाडी ही सोन्याची काडी आहे " असे म्हटले जाते.या झाडीपट्टीत बोलली जाणारी बोली ती झाडीबोली.ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभाग व संशोधन केंद्राद्वारे 'झाडीबोलीतील उखाणे,म्हणी,वाक् प्रचाराचे संकलन ' करण्याचा उपक्रम प्राचार्य डॉ डी एच गहाणेंच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ,धनराज खानोरकर,डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडेंनी राबविला.या उपक्रमात चक्क सत्तर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून झाडीबोलीतला खजिनाच संकलित केल्याचा अनुभव सर्वांना आला.
ब्रह्मपुरी परिसरातीलच बोंडेगावात विद्यार्थ्यांनी जाऊन घेणं न् देण तेल लावून येणं,धनी धु-यावर मोमद्या मा-यावर,भलतीच उन्ह सुकली सून,करी सारी वाया गेली अन् वटरे गोंजारी पुढे झाली,आजकालच्या सूना लावतेत चूना, सासरा घराचा आसरा,तू आण तणीस मी भाजतो कणीस,अधीमधी मी न् ढेकलाचा बी,दीर पाहून भांग करते न् नवरा पाहून सोंग करते,काह्यून बाई अशी माजी वासनाच तशी,मी कशी दिसतो अन् चुलीचा ईस्तो इ.ग्रामीण भागातील प्रचलित असलेल्या झाडीबोलीतील मौखिक अस्सल म्हणीं,वाक् प्रचाराचा खूप मोठा लोकसाहित्य भांडार सामोरे आला.
या उपक्रमाबद्दल मराठी विभागचे प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी कौतुक केले.यासाठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर,डॉ,पद्माकर वानखडेंनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.