महाराष्ट्र दिन,गौरव गुणवंतांचा आणि शाळापूर्व तयारी मेळावा. ★ जि.प.उ.प्राथ.शाळा,खेमजई बिट-शेगाव(बु.) पं.स.वरोरा

महाराष्ट्र दिन,गौरव गुणवंतांचा आणि शाळापूर्व तयारी मेळावा.


★ जि.प.उ.प्राथ.शाळा,खेमजई बिट-शेगाव(बु.) पं.स.वरोरा


एस.के.24 तास


चिमुर : आज दि.१ मे २०२३ रोज सोमवारला उत्साही वातावरणात शा.व्य.स.अध्यक्ष मा.गुणवंतजी कापटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.त्यानंतर शाळापूर्व तयारी पहिला मेळावा आयोजित करण्यात आला.1 ते 7 असे टेबल लावून स्वयंसेवक,अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांच्या मदतीने हा मेळावा पार पडला.


मागच्या वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील वर्षभर चाललेला उपक्रम एक वार-दप्तराविना शनिवार यातील 11 वैयक्तिक आणि 4 सामूहिक स्पर्धेतील  प्रथम,द्वितीय तथा तृतीय क्रमांक  प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.वैयक्तिक स्पर्धेमध्ये 


1)पुस्तक परिचय स्पर्धा 

2)सामान्य ज्ञान स्पर्धा 

3)कथाकथन स्पर्धा 

4)चित्रकला स्पर्धा 

5)स्मरणशक्ती स्पर्धा 

6)वक्तृत्व स्पर्धा 

7)स्वयंस्फुर्त लेखन स्पर्धा

8)एकपात्री भुमिकाभिनय स्पर्धा 

9)सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 

10)वादविवाद स्पर्धा 

11)स्वच्छ मुलगा-मुलगी स्पर्धा

आणि सामूहिक स्पर्धेमध्ये

1)वर्ग स्वच्छता स्पर्धा

2)दैनिक परीपाठ स्पर्धा

3) शालेय परिसर स्वच्छता 

4) स्वच्छ मुलगा-मुलगी स्पर्धा 

घेण्यात आल्या.वैयक्तिक स्पर्धेत एक स्पर्धा वर्षभरात तीन वेळा घेण्यात आली आणि शेवटी सरासरी काढून क्रमांक देण्यात आले.अशा 33 वैयक्तिक स्पर्धा आणि दर शनिवारला चारही सामूहिक स्पर्धा वर्षभर चालल्या. 1 जुलै2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत हा उपक्रम पार पडला.


सर्वात जास्त गूण घेत प्राथ.विभागातून CLASS OF THE YEAR 2023 हा सन्मान वर्ग 4थी ला मिळाला. तर उच्च प्राथ.विभागातून हा सन्मान वर्ग 7 वी ला मिळाला.


सर्वांत जास्त गूण घेत प्राथ.विभागातून STUDENT OF THE YEAR 2023 हा सन्मान कु.श्रद्धा शेषराव चौधरी,वर्ग 4था आणि उच्च प्राथ.विभागातूनकु.नियती शेषराव चौधरी,वर्ग 7वा यांना प्राप्त झाला.


लोकसहभागातून शाळेचा विकास : - 


आजवर खेमजई ग्रामस्थांनी वेळोवेळी शाळेला केलेली मदत उल्लेखनीय आहे.त्यांची कौतुकाची पाठीवरील थाप आणि सहकार्याची भावना यामुळेच सर्व शालेय उपक्रम यशस्वी होतात.आजच्या कार्यक्रमासाठी मेडल्स आणि ट्राॕफीजसाठी देखील लोकसहभाग लाभला.


सौ.मनिषाताई चौधरी,सरपंचा ग्रा.पं.खेमजई,श्री.चंद्रहासजी मोरे,उपसरपंच ग्रा.पं.खेमजई,श्री.गुणवंतजी कापटे,अध्यक्ष शा.व्य.समिती,सौ.माधुरीताई चौधरी,उपाध्यक्षा शा.व्य.समिती,ग्रामपंचायत खेमजई,गुरूदेव सेवा मंडळ खेमजई,विर बिरसा मुंडा क्रिडा मंडळ,खेमजई आणि ग्रामोन्नती शेतकरी मंडळ,खेमजई यांच्या सौजन्याने पुरस्कार प्राप्त झाले.आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित आदरनिय पालक,खेमजई ग्रामस्थ,ग्रा.पं. सदस्य, शा.व्य.समिती सदस्य,विविध सामाजिक मंडळांचे पदाधिकारी,सदस्यगण यांनी सोहळ्याची शोभा वाढवली.


संघटन शक्ती फार मोठी शक्ती आहे.मुख्याध्यापक श्री.रामकृष्ण बलकी सर यांच्या नेतृत्वाखाली सौ.चेतना मून मॕडम(सुंदर हस्ताक्षर स्पर्धा प्रमुख) श्री.संजू जांभुळे सर(वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा प्रमुख) श्री.रविंद्र साखरकर सर(पुस्तक परिचय आणि स्वयंस्फुर्त लेखन स्पर्धा प्रमुख) श्री.अनिल वाघमारे सर (सामान्य ज्ञान आणि स्मरणशक्ती स्पर्धा प्रमुख) श्री.ईश्वर टापरे सर (कथाकथन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,एकपात्री भुमिकाभिनय स्पर्धा,स्वच्छ मुलगा-मुलगी स्पर्धा प्रमुख ) म्हणून वर्षभर आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली.*टिमवर्क असेल तरच मोठमोठे उपक्रम आणि सोहळे यशस्वी होतात. 


हाच उपक्रम पुढच्या वर्षीदेखील नव्या रूपात 

TO BE CONTINUE.


शब्दांकन✍️ ELT श्री.ईश्वर लक्ष्मणराव टापरे(स.शिक्षक)जि.प.उ.प्राथ.शाळा,खेमजई 9637311772

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !