गोकुलनगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे आज दिनांक १ मे रोजी उद्घाटनाला प्रामुख्याने खासदार अशोक नेते यांची उपस्थिती.

गोकुलनगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे आज दिनांक १ मे रोजी उद्घाटनाला प्रामुख्याने खासदार अशोक नेते यांची उपस्थिती.


एस.के.24 तास

गडचिरोली : दिनांक,०१ मे.२०२३ जिल्हयातील गोकुलनगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  "आपला दवाखाना" च्या उद्घाटनाला प्रामुख्याने खासदार अशोक नेते यांनी उपस्थित राहून  शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी सोयीसुविधा,सुलभ व परवडणारी दर्जेदार आरोग्यसेवा,उपलब्ध व्हावी.

यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना / नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे गोकुलनगर गडचिरोली येथे आज  दिनांक ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन आपला दवाखाना चे उदघाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

आपला दवाखाना आधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविणे सातत्यपूर्ण व गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देणे. विविध रोगाचा प्रादुर्भाव आणि निरिक्षण व नियंत्रण करणे. सुलभ व परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा देणे, शहरी भागातील गरीब रुग्णासाठी मोफत सोयीसुविधा असे विविध प्रकारच्या सेवा  शहरी भागातील जनसामान्य गोर गरीब झोपडपट्टी भागात राहणा-या नागरीकांसाठी गडचिरोली आरोग्य विभागामार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत स्थापित केले. 


आपला दवाखानाअंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये खालीलप्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी लसिकरण, महीण्यातील निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा,बाहय  यंत्रणेव्दारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा,याकरीता वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारीका, बहुदेशिय आरोग्य कर्मचारी,अटेन्डन गाई व सफाई कर्मचारी याप्रकारे मनुष्यबळ कार्यरत राहील.हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार जिल्हयातील ठराविक नागरी आरोग्य केंद्रामध्ये पॉलिक्लिनीक सुरु केल्या जाईल यामध्ये तज्ञ डॉक्टरांची सेवेचा लाभ जनतेस दिला जाईल. सर्वांनी या दवाखाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.


जनसामान्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असुन आरोग्य केंद्रातून उपलब्ध सोयी सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,आरोग्य मंत्री मान. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे उद्घाटन आज  ०१ मे या महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला. 


हि एक आजच्या दिनी आरोग्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. निश्चितच याचा फायदा सामान्य जनतेपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने  सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होईल.यावेळी आपला दवाखाना ची पाहणी करून आरोग्यातील  प्रशासनाला कर्तव्यात तत्पर राहण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.


या प्रसंगी कार्यक्रमाला  प्रामुख्याने  खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,आमदार डॉ.देवराव होळी,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,अति.मु.का.अ. राजेंद्र भुयार साहेब, जिल्हा.आ.अ.डॉ.दावल साळवे साहेब, जिल्हा.शल्य.चिकित्सक डॉ.अनिल रुडे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर,DRCHO डॉ.स्वप्नील बेले,DTOडॉ. सचिन हेमके,RMO डॉ. बागराज धुर्वे,DMO डॉ. कुणाल मोडक,DSO डॉ.विनोद म्हशाखेत्री,THO डॉ.सुनील मडावी,माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे,MO डॉ.सिमा गेडाम,DPM डॉ.राहुल ठिगडे,तसेच आरोग्यवर्धिनी,आरोग्य सेवक,सेविका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !