छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर दिनांक 5 मे च्या ऐवजी दिनांक नऊ मे रोजी आयटीआय मध्ये संपन्न होणार.
एस.के.24 तास
गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली (आयटीआय) मध्ये दिनांक ९ मे रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर शिबिरामध्ये दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी तसेच व्यक्तिमत्व विकास , मुलाखतीचे तंत्र या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या विविध बँका आणि वित्तीय संस्था यांचे सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे सुद्धा रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी शासनाच्या विविध योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी याविषयी आणि अग्नी वीर योजनेविषयी मेजर श्री अभिषेक दत्ता नागपूर सैन्य अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. सदर शिबिराचा गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालक यांनी उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन , जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी श्री वैभव बोंगिरवार आणि आयोजक संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे यांनी केले आहे.