29 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर.

29 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर.


एस.के.24 तास


चंद्रपूर : तहसील कार्यालय, चंद्रपूर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन 29 मे रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.


समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, महिलांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा.  तसेच शासकीय यंत्रणेकडून महिलांच्या अडचणींची सोडवणूक व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा मिळावी या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


या शिबिरास महानगरपालिका, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण, कृषी, भूमि अभिलेख, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन, समाजकल्याण, उमेद, महावितरण, महिला व बालविकास, पुरवठा विभाग व तालुक्यातील इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून विविध योजनांची माहिती देणार आहे. त्यासोबतच जिल्हास्तरावरून वन स्टॉप सेंटर, चाईल्ड लाईन व बाल संरक्षण कक्ष या विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.


तरी, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !