ब्रम्हपुरी येथे दिनांक 26 मे 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे आयोजन.

ब्रम्हपुरी येथे दिनांक 26 मे 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर  शिबीराचे आयोजन.


अमरदीप लोखंडे ! सहसंपादक


ब्रम्हपुरी : २२/०५/२३ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदार संघामध्ये  'छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर  शिबीर तथा समुपदेशन मेळावा' आयोजित करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने शास. औ. प्र. संस्था ब्रम्हपुरी तर्फे  छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर  शिबीर तथा समुपदेशन मेळावा' स्व. मदनगोपाल भैय्या सभागृह,ने.हि.महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे दिनांक 26 मे 2023 रोज शुक्रवारला सकाळी 10.00 सपन्न होत आहे. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.विजयभाऊ वडेट्टीवार आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते पार पडणार आहे. प्रमुख पाहुणे  मा. संदिप भस्के उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, मा. मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, मा.डॉ.ए.डब्ल्यू.पावडे प्राचार्य शास. तंत्र निकेतन ब्रम्हपुरी, मा. डॉ. डी. एच. गहाणे प्राचार्य नेवजाबाई हितकारिणी ब्रम्हपुरी, मा. आर. पी. मेहेंदळे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी चंद्रपूर हे राहणार आहेत.  डॉ. विनोद आसुदानी नँशनल लेव्हल अकँडमेशिअन, मोटीव्हेटर कँरिअर कौंशिलर व फिजीओलाँजीस्ट नागपूर, मा. डी. एम. गाढवे सर तंत्र निकेतन ब्रम्हपुरी, डॉ. के. एस. नाकतोडे एन.ए सी.सी. को-आर्डीनेटर नेवजाबाई हितकारिणी ब्रम्हपुरी यांचे प्रमुख मार्गदर्शक लाभणार आहे.


          या शिबिरात युवक युवतींना पुढील शिक्षणासंबंधी निवडीचे क्षेत्र व रोजगार, त्याकरीता उपलब्ध आर्थिक सहाय्य व विविध शाखा संबंधीचे मार्गदर्शन मिळणार आहे.

         शिबिरात विविध प्रकारचे स्टाँल असणार आहेत. त्यात स्टाँल 1. आय.टी.आय अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेश व प्रवेश प्रक्रिया. संस्थेतील व्यवसायाची माहिती, स्टाँल 2. पाँलीटेक्नीक व इंजिनिअरींग अभ्यासक्रमाची माहिती,कळलप्रवेश व प्रवेश प्रक्रिया,स्टाँल 3.शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती माहिती, स्टाँल 4. रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती,स्टाँल 5. स्थानिक शैक्षणिक संस्थांची माहिती, स्टाँल 6. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधी माहिती.

         तरी परिसरातील युवक - युवतींनी, पालकांनी या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा.  तसेच नोंदणीकरीता क्यु. आर. कोड स्कँन करा व आपली माहिती भरा असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक श्री. भैय्याजी येरमे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योतक मार्गदर्शन केंद्र  चंद्रपूर व श्री. राजेश डांगे प्राचार्य, शास. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रम्हपुरी यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !