खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण पर्यावरण जीवन पद्धती 2023 अभियान ; कृषी विभागाचा अभिनव उपक्रम.


खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण पर्यावरण जीवन पद्धती 2023 अभियान ; कृषी विभागाचा अभिनव उपक्रम.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : २६/०५/२३ दिनांक 24/5/2023 ला मौजा- कोल्हारी तालुका ब्रम्हपुरी येथे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी चंद्रपूर व प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप हंगाम पूर्व जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान 22 ते 28 मे 2023 या कालावधीत सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.तुपटे सरपंच कोल्हारी,तसेच प्रमुख मार्गदर्शक कु.डाॅ. सोनाली लोखंडे विशेषतज्ञ कृषी विज्ञान केंद्र सींदेवाही यांनी माती नमुना घेण्याची पद्धत व रिपोर्टनुसार द्यावयाची खते तसेच भाजीपाला व फळझाड लागवड व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने बाबत तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री पी.डी. खंडाळे तालुका कृषी अधिकारी, ब्रह्मपुरी यांनी खरीप हंगाम पूर्व नियोजन व धान लागवड उत्पादन तंत्रज्ञान व लागवडीपासून ते काढणीपश्चात करावयाच्या विविध उपायोजना व खर्चाची बचत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 


तसेच श्री.सोरदे कृषी पर्यवेक्षक यांनी बीज प्रक्रिया व त्याचे फायदे तसेच महाडीबीटी या योजनेअंतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री.बंगाळे कृषी सहाय्यक यांनी धान लागवडीच्या पद्धती व मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड व गोपीनाथ मुंडे शेतकरीअपघात विमा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


 श्री.हातझाडे सा.तं.व्य.आत्मा यांनी शेतकरी बचत गट नोंदणी व आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेंद्रिय शेती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री.भुरले प्रगतशील शेतकरी यांनी पेरभात पद्धती बाबत त्यांचे अनुभव कथन केले. सदर कार्यक्रमांमध्ये शेतकरी व बचत गटातील महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.बंगाळे कृषी सहाय्यक कोल्हारी यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !