20 दिवसीय अंकुर शिबिराचा निरोप समारंभ संपन्न.

20 दिवसीय अंकुर शिबिराचा निरोप समारंभ संपन्न.


एस.के.24 तास


चिमुर : ब्राईटएज फाउंडेशन भिवापूरच्या वतीने आयोजित वीसदिवसीय निवासी अंकुर शिबिराचा समारोप दिनांक 30 मे 2023 रोजी डॉ रमेश कुमार गजबे शिक्षा संकुल पुयार्दंड भिसी येथे संपन्न झाला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री डॉ रमेश कुमार गजबे, अध्यक्ष म्हणून रामराव नन्नावरे,प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णूजी तोंडरे, अरविंदजी सांदेकर,रवींद्र काळमेघे, हरिदासजी श्रीरामे प्रामुख्याने उपस्थित होते.

दिनांक 10 मे ते 30 मे दरम्यान 11 ते 15 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकुर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारी सोबतच अनेक कृती कार्यक्रम या शिबिरात राबवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे यांनी केले. 

तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष परिश्रम करणारे अंकुर संयोजक विवेक चौके, सीमाताई चौके, मॅजिक संयोजक तथा व्यवस्थापक वाल्मिक नन्नावरे, साहस संयोजक विलास चौधरी,अंकुर टीमचे स्वप्निल जांभूळे, ज्ञानेश्वर मगरे यांच्यासोबतच संदीप चौधरी ,संदीप खडसंग अंकुर मास्टर सुधाकर चौके विनोद जांभूळे, रवींद्र काळमेघ, श्री नन्नावरे व मॅजिक विद्यार्थी यांचे आभार मानले. 


यामध्ये त्यांनी संपूर्ण शिबिराचा आढावा पालकांसमोर मांडला. अंकुरचे माजी विद्यार्थी व नवोदय परीक्षेत पास झालेले जयेश जांभूळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोपुलेशन सायन्सेस मुंबई येथे निवड झालेली सालोरी येथील शितल मगरे हिचा सुद्धा आई कलावती मगरे यांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये अंकुर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पालकांसमोर मनोगत व्यक्त केले व अंकुर शिबिरामध्ये विद्यार्थी काय काय शिकले? यांचा पाढाच त्यांनी वाचला यामध्ये आर्या हनवते,अन्वय गजबे, अमित चौधरी,मानव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पाहुण्यांच्या मार्गदर्शनामध्ये विष्णुजी तोंडरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी स्वतःचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगत विद्यार्थ्यांप्रती असलेल्या पालकाच्या जबाबदारी चे महत्व अधोरेखित केले. तसेच डॉ.रमेश कुमार गजबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. अंकुर विद्यार्थ्यांनी स्वतःकडे उरलेले खाऊचे पैसे मॅजिक विद्यार्थी मदत निधी बॉक्समध्ये सपूर्त करून मॅजिक उपक्रमाला 4 हजार रुपयाचे वर मदत केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुर विद्यार्थिनी आकांक्षा गरमडे व खुशी चौधरी तर आभार प्रदर्शन रिया मगरे हिने केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !