भर उन्हात तीन हजार आदिवासी रस्त्यावरच ; तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू.
राजेंद्र वाढई!उपसंपादक
चंद्रपूर : अंगाची लाहीलाही करणाऱ्या तापमानात हजारो आदिवासींनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसापासून पोंभुर्णा शहरातील मध्यभागी असलेल्या बसस्थानक चौकात ठिय्या दिला आहे. ५० टक्के आदिवासीबहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या,
सूरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढवण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन आदिवासींचे हे आंदोलन सुरू आहे.