बहुजन व बौद्ध समाज,भालेश्वर यांनी संयुक्तपणे साजरी केली भीम जयंती.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१५/०४/२३ तालुक्यातील वैनगंगा किनारी वसलेल्या समानतेचे तत्व पाडणाऱ्या भालेश्वर या गावी बहुजन ओबीसी समाज व बौद्ध समाज यांनी संयुक्तपणे विश्वरत्न डॉ.परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती मोठ्या थाटामाटात, मिळून मिसळून संपूर्ण गावातील स्त्री-पुरुष यांनी बौद्ध विहाराच्या पटांगणात साजरी केली.
भालेश्वर या गावच्या परंपरेचा, आदर्शाचा बोध घेण्यासारखा आहे तो म्हणजे या गावची चालत आलेली सर्वांना समानतेची वागणूक , एकमेकांच्या मदतीला कोणत्याही क्षणी धावून जाणे आणि मदतीचा हात देणे. भालेश्वर या गावचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे बौद्ध समाज व ओबीसी समाज गावातील कोणतेही घरगुती वा सामाजिक कार्यक्रम संयुक्तरित्या खेळीमेळीच्या वातावरणात एकोप्याने साजरे करीत असतात. तेथील स्त्री-पुरुष जातीयतेला थारा न देता जाती निर्मूलनाला महत्त्व देतात.