एस.के.24 तास
सावली : अवैधरीत्या प्रतिबंधित सुंगधित तंबाखूची तस्करी करून ईगल,मजा तंबाखूमध्ये भेसळ करणाऱ्याला एकाला सावली पोलिसांनी शुक्रवारी रात्री व्याहाड खुर्द येथे अटक केली. राहुल खोब्रागडे,असे आरोपीचे नाव आहे.दरम्यान,मुख्य सूत्रधार गडचिरोलीचा असल्याची माहिती पुढे आली आहे.त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
व्याहाड येथे सुंगधित तंबाखूची तस्करी केली जात असल्याचे माहिती सावली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. यावेळी प्रतिबंधित सुंगधित तंबाखू व १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी राहुल खोब्रागडे याला अटक करण्यात आली आहे.
तंबाखूमध्ये भेसळ करणारा मुख्य सूत्रधार हा गडचिरोलीतील असून, त्याचा शोध सावली पोलिस घेत आहेत.या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे.